हास्ययोग प्रणेते, माजी प्राचार्य डॉ. सुभाष देसाई यांचे निधन

71

पुणे : लोकमान्य हास्ययोग संघ परिवाराचे संस्थापक-अध्यक्ष, हास्ययोग प्रणेते व फर्ग्युसन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देसाई यांचे नुकतेच निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. सेवाभावी नेतृत्व करणारे, ध्यानीमनी हास्ययोग जगणारे डॉ. देसाई ध्येयनिष्ठ, कर्तव्यदक्ष व निष्ठावंत तपस्वी होते. 

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी पुण्यात लोकमान्य हास्ययोग संघाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या मार्गदर्शनात आज पुण्यात आणि पुण्याबाहेर ७० हुन अधिक शाखांची निर्मिती झाली आहे. गेली २५ वर्षे सातत्याने हास्ययोग हाच ध्यास आणि श्वास मानणारे डॉ .देसाई यांच्या निधनामुळे हास्यप्रेमींची अपरिमित हानी झाली आहे.