पुणे क्राईम : पुणे जिल्ह्यातील व्यापारी-कार्यकर्ते किशोर आवारे (48) यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, त्यांचा भाऊ सुधाकर शेळके आणि इतरांविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेजवळ दुपारी 1.45 च्या सुमारास किशोर आवारे यांची सहा जणांच्या टोळक्याने गोळ्या झाडून हत्या केली होती. या हत्येनंतर मावळमध्ये खळबळ उडाली आहे.
किशोर आवारे यांची आई सुलोचना गंगाराम आवारे (69) यांनी शुक्रवारी रात्री पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हद्दीतील तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात याप्रकरणी एफआयआर दाखल केला. सुलोचना आवारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके, सुधाकर शेळके, श्याम निगडकर, संदिप गरड आणि इतर तिघे जण तळेगाव दाभाडे येथील रहिवासी असून, भारतीय दंड संहिता आणि भारतीय शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.