हडपसर येथे १ जानेवारीला होणारी ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ आता ८ जानेवारीला !
पुणे- हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १ जानेवारी या दिवशी हडपसर येथील कै. मारुतराव काळे प्राथमिक विद्यालयाच्या मैदानात ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले होते; मात्र काही अपरिहार्य कारणांमुळे ही सभा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही सभा १ जानेवारी ऐवजी ८ जानेवारी यादिवशी याच मैदानात होणार आहे, याची सर्व हिंदु बांधवांनी नोंद घ्यावी.
या सभेचा तपशील –
वार – रविवार, दिनांक ८ जानेवारी २०२३ ,वेळ – सायंकाळी ६ वाजता.
स्थळ – कै. मारुतराव काळे प्राथमिक विद्यालयाचे मैदान, प्रगती शाळेजवळ, काळेबोराटे नगर (काळेपडळ), हडपसर, पुणे.
या सभा स्थळी हिंदूंवर होणार्या आघातांविषयी सचित्र फ्लेक्स प्रदर्शन, हिंदूंना धर्मशिक्षण देणारे आणि धर्मजागृती करणारे ग्रंथप्रदर्शन आणि प्रबोधन करणारा बाल कक्ष हे आकर्षण असणार आहेत. तरी या सभेस समस्त हिंदूंनी अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. पराग गोखले यांनी केले आहे.अशी माहिती पराग गोखले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.