‘स्वराज ट्रॅक्टर्सच्या’ ‘स्वराज ८२०० व्हील हार्वेस्टर’चे अनावरण; अतुलनीय स्वरुपाची कार्यक्षमता आणि तंत्रज्ञान यांमुळे शेतकऱी होणार सक्षम

17
Swaraj-Harvester

मोहालीऑगस्ट २०२३ : देशातील वेगाने वाढणाऱ्या व महिंद्र समुहाचा भाग असणाऱ्या स्वराज ट्रॅक्टर्स या ब्रॅंडतर्फे ‘स्वराज ८२०० व्हील हार्वेस्टर’ हे यंत्र आज सादर करण्यात आले. या यंत्रामध्ये सर्वोत्तम श्रेणीची इंधन व्यवस्था आणि उद्योगात प्रथमच सादर होणारी तांत्रिकदृष्ट्या प्रगत वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.

 

या नव्या हार्वेस्टरच्या माध्यमातून स्वराज या ब्रॅंडची ताकद आणि विश्वासार्हता यांचा वारसा पुढे नेण्यात येत आहे. कापणीचा ताशी वेग जास्त असल्याने या हार्वेस्टरमुळे धान्याच्या कापणीची उत्कृष्ट क्षमता मिळते. धान्याची कमीत कमी हानी आणि उच्च दर्जाचे धान्योत्पादन यांची हमी यातून शेतकऱ्याला मिळू शकते.

  • कापणीचे दरएकरी क्षेत्र जास्त प्रदान करणाऱ्या स्वराज ८२००मधून शेतकऱ्यांना मिळते उत्तम दर्जाची धान्य उत्पादनाची गुणवत्ता  अधिकाधिक नफा.
  •  स्वराजचा बुद्धिमान व्हील हार्वेस्टर स्वराज ८२०० मिळवून देतो मालक आणि ऑपरेटर्ससाठी अतुलनीय फायदे.

कृषी उपकरणांच्या उद्योगात प्रथमच सादर होणारी अनेक वैशिष्ट्ये स्वराज ८२००मध्ये आहेत. यातीलच एक म्हणजे तिची बुद्धिमान प्रणाली. किती एकर जागेवरील कापणी झाली आहेकिती किलोमीटरचा प्रवास झालाइंधन किती खर्च झालाअशी माहिती ही प्रणाली देतेचत्याशिवाय लाइव्ह लोकेशन ट्रॅकिंगचीही सोय त्यात आहे. हार्वेस्टरच्या मालकांना ही रीअल-टाइम माहिती मिळाल्याने त्यांना योग्य ते निर्णय घेता येतात आणि कार्यक्षमता वाढवता येते.

हार्वेस्टरची सर्व्हिसिंगतिची एकंदर स्थिती यांविषयी या प्रणालीमधून अलर्ट मिळतात. तसेच अॅडब्लू लेव्हल इडिकेटर व इंजिन अलर्ट यांमुळे उपकरणाचे मालकशेतकरी आणि उपकरणे भाड्याने देणारे उद्योजक यांना रीअल-टाइम मॉनिटरिंग करता येते. यातून या यंत्राचा वापर जास्तीत जास्त करून ते अधिक नफा मिळवू शकतात. हार्वेस्टरची सर्व्हिसिंग करीत असताना डाउनटाइमही कमी होतो.

सुमारे २३ एकरांवर पसरलेल्या कंपनीच्या स्वत:च्या अत्याधुनिक कारखान्यामध्ये स्वराज ८२०० व्हील हार्वेस्टरचे उत्पादन घेण्यात येते. अत्यंत इंधन-कार्यक्षम असे इन-हाउस टीआरईएम-फोर कॉम्लायन्ट इंजिन या हार्वेस्टरमध्ये बसवण्यात आले आहे.

अर्गोनॉमिक रचना असणाऱा हा हार्वेस्टर आरामात चालविता येतो. प्रदीर्घ काळ तो चालविल्यानंतरही चालकाला कमी प्रमाणात थकवा जाणवतो. समर्पित रिलेशनशिप मॅनेजर आणि अॅप-आधारित व्हिडिओ कॉलिंग यांच्या माध्यमातून वैयक्तिकृत मदत करण्याची सोय कंपनीने करून दिल्यामुळे चालकांना त्वरीत आणि सोयीस्कर घरपोच सेवाही मिळते.

महिंद्रा अॅंड महिंद्रा लि.च्या कृषी अवजार विभागाचे प्रमुख हेमंत सिक्का या संदर्भात म्हणाले, “स्वराज ८२०० व्हील हार्वेस्टर‘ सादर करून आम्ही कृषी यंत्रसामग्रीवर लक्ष केंद्रीत करण्याच्या आमच्या धोरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे. तसेच या क्षेत्रातील प्रगतीला चालना देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. शेतीच्या आधुनिकीकरणास आणि शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सक्षम करण्यास आम्ही कटिबद्ध आहोतयाचा हा हार्वेस्टर म्हणजे एक उत्तम पुरावा आहे.”

महिंद्रा अॅंड महिंद्रा लि.च्या स्वराज विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश चव्हाण म्हणाले, “सर्वोत्तम यांत्रिकी अवजारे पुरवून शेतकर्‍यांना जास्तीत जास्त पिक उत्पादन आणि नफा मिळवण्यास सक्षम करणेआणि त्यायोगे शेती व्यवसायात परिवर्तन घडवून समृध्दी आणणेयाकरीता स्वराज वचनबद्ध आहेआमच्या ग्राहक केंद्रिततेचाआधुनिक शेती पद्धती अवलंबिण्याचा आणि शाश्वत शेतीसाठीच्या समर्पणाचा स्वराज ८२०० व्हील हार्वेस्टर हा पुरावा आहे.”

स्वराज ८२००‘ व्हील हार्वेस्टर हे यंत्र स्वराजच्या देशभरातील वितरकांच्या विस्तृत नेटवर्कद्वारे उपलब्ध होईल. स्वराजची विक्री आणि सेवा देणारी निष्णात तंत्रज्ञांची पथकेमहत्त्वाच्या ठिकाणी असलेली हब आणि सर्व्हिस व्हॅन असा मोठा लवाजमा ग्राहकांसाठी सज्ज आहे. 

सर्वोत्कृष्ट स्वरुपाची आणि या क्षेत्रात प्रथमच सादर होणारी अनेक वैशिष्ट्ये असल्याने स्वराज ८२०० हार्वेस्टर’ त्याच्या श्रेणीत सर्वोत्तम ठरतो. ही वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :

  • इंटेलिजेंट इंजिन : टर्बोचार्ज केलेलेइंटरकूल्ड टीआरईएम-फोर इंजिनयामुळे प्रतितास एकरी कापणीमध्ये वाढतसेच कापणीची उच्च कार्यक्षमता शक्य.
  •  स्मार्ट ई तंत्रज्ञान : हार्वेस्टरच्या मालकांना लाइव्ह मशीन लोकेशन (हार्वेस्टरमधून रिमोट अॅक्सेस)
  •  मोबाइल वापरणाऱ्या मालकांसाठी व्यवसाय सांभाळण्याच्या सुविधा दरएकर कापणीरस्त्यावर कापलेले अंतरइंधनाची पातळी यांची आकडेवारी.
  •   सर्व्हिसिंग आणि इंजिनाची स्थिती यांविषयीच्या सूचना मोबाइल फोनअॅडब्लू लेव्हल इंडिकेटर यांच्यावर मिळण्याची सोय.
  • चालकासाठी आरामदायीपणा : प्रशस्त ऑपरेटर प्लॅटफॉर्मटिल्ट स्टीयरिंगरस्ता वाहतुकीसाठी फूट पेडल.
  • स्मार्ट सेवा : समर्पित रिलेशनशिप मॅनेजर आणि व्हिडिओ कॉलची सेवा यांचे सहाय्य.
  • टिकाऊपणा आणि कमी देखभाल : एक हजार तासांच्या एसएसटी व यूव्ही लाईफसह मिळणारी सर्वोत्तम श्रेणीतील पेंटची गुणवत्ताझिंक-प्लेटेड आणि पेंट केलेले अंडरबॉडी शाफ्टडीप सील ब्लू-कोटेड शाफ्टदीर्घायुष्य आणि किमान देखभाल यांकरीता पेंट केलेल्या पुली आणि स्पीड चेंजर.