पुणे : हिंदी चित्रपट संगीतातील १८० पेक्षा अधिक गायकांवर स्वप्नील पोरे लिखित ‘स्वरसागर’ संदर्भग्रंथावर चर्चासत्र व गायन मैफलीचे आयोजन केले आहे.
समीक्षक व स्तंभलेखक रविप्रकाश कुलकर्णी, लेखक व समीक्षक प्रा. विश्वास वसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत किशोर सरपोतदार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, दि. ३ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता पूना गेस्ट हाऊस, लक्ष्मी रोड येथे हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे गायकांच्या काही आठवणी व त्यांची गाणी कलाकार गाणार आहेत. यामध्ये हेमंत वाळुंजकर, दत्ता थिटे, संजय मरळ, हेमंत खणंग, पल्लवी पाठक, मनाली राजे, आरती कवठेकर, वैजू चांदवले या कलाकारांचा यात समावेश आहे.
पूना गेस्ट हाऊस स्नेहमंच व दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.