पुणे, डिसेंबर ०७ , २०२२ : स्मिथ्स ग्रुप इंडिया, या स्मार्ट इंजिनियरिंगद्वारे सुधारणा घडवून आणणाऱ्या ब्रिटिश- स्थित जागतिक औद्यौगिक तंत्रज्ञान कंपनीने 38 लाख रुपये किंमतीचे सौर पॅनेल्स बसवून भारतातील सर्वात मोठ्या स्वयंचलित एनजीओ, एसओएस चिल्ड्रेन्स व्हिलेज, पुणे यांना समर्थन दिले.
आक्रिती – रिशेपिंग लाइव्ह्ज बाय स्मिथ्स’ या सीएसआर उपक्रमाअंतर्गत हे सौर पॅनेल्स एसओएस चिल्ड्रेन्स व्हिलेज आणि पुण्यातील युथ होम येथे बसवण्यात आले आहेत. आक्रितीने स्मिथ्स सहकाऱ्यांना भारतातील समाजासाठी अर्थपूर्ण मार्गाने योगदान देता येण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यातून हा स्मिथ्स समूहाच्या विस्तृत शाश्वतता प्रयत्नांचा भाग होणार आहे.
हे सौर पॅनेल्स शाश्वततेला प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील, शिवाय ते पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचे आहेत आणि लहान मुले/तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी अप्रत्यक्षपणे हातभार लावतील. एसओएस चिल्ड्रेन्स व्हिलेज, पुणे, बावना आणि कोची येथील तीन फॅमिली होम्सचे प्रायोजकत्वही कंपनीने घेतले आहे.
एसओएस चिल्ड्रेन्स व्हिलेज ऑफ इंडियाचे सेक्रेटरी जनरल श्री. सुमांता कर म्हणाले, ‘एसओएस चिल्ड्रेन्स व्हिलेज ऑफ इंडियाला सौर पॅनेल्स पुरवून शाश्वतता आणि हरित तंत्रज्ञानाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्यासाठी केलेल्या मदतीबद्दल आम्ही भारतातील स्मिस्थ्स समूहाचे आभारी आहोत. यामुळे आमच्या पुण्यातील सुविधा केंद्राला कार्बन उत्सर्जन कमी करण्यात मदत होईल, शिवाय विजेच्या वापराचा खर्चही कमी होईल.’
वाढत्या कार्बन उत्सर्जनामुळे पर्यावरणाची होत असलेली हानी तसेच निरोगी समाजासाठी पर्यावरणाचे आरोग्य जपण्याचे महत्त्व लक्षात घेणे आवश्यक झाले आहे. एसओएस चिल्ड्रेन्स व्हिलेज, पुणे येथे बसवण्यात आलेल्या सौर पॅनेल्समुळे मुलांना शाश्वत राहाणीमानाविषयी माहिती देणे आणि पर्यावरणाच्या जपणुकीतील त्यांच्या भूमिकेची जाणीव करून देणे, भविष्यातील पिढ्यांसाठी पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने बदल करण्यास शिकवणे सहज शक्य होणार आहे.
स्मिथ्स समूह, इंडियाचे अध्यक्ष, एमडी कौन्सिल श्री. विक्रांत त्रिलोकेकर म्हणाले, ‘एसओएस चिल्ड्रेन्स व्हिलेज ऑफ इंडियासह केलेल्या भागिदारीची भारतात कशाप्रकारे प्रगती होत आहे हे पाहाणे तसेच आपल्या देशाचे भविष्य असलेल्या मुलांचे आयुष्य अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्न करणे आमच्यासाठी आनंददायी आहे. एक जबाबदार कंपनी या नात्याने आम्ही ज्या समाजात काम करतो, त्याचे ऋण फेडण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्य साकार करण्यासाठी पर्यावरणाशी बांधील आहोत.’
पर्यावरण बदलाचा सामना करत उर्जेच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी सौर उर्जा अतिशय महत्त्वाची आहे. स्मिथ्सतर्फे एसओएस चिल्ड्रेन्स व्हिलेजमध्ये छोट्या पातळीवर का होईना बसवण्यात आलेले सौर पॅनेल्स शाश्वत भविष्याच्या योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे. फॅमिली होमसाठी मिळालेल्या प्रायोजकत्वाच्या मदतीने