स्नॅपडीलकडे ओएनडीसी ऑर्डर येऊ लागल्या

103
Pune: India's leading e-commerce platform Snapdeal today announced that it has started accepting orders through the Open Network for Digital Commerce (ONDC).

पुणे : स्नॅपडील या भारतातील अग्रगण्य अशा किफायतशीर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने आज जाहीर केले की, त्यांना ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सच्याद्वारे (ओएनडीसी-ONDC) ऑर्डर्स मिळण्यास सुरुवात झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला ग्राहकांसाठी प्रत्यक्षपणे सुरू झालेल्या  या सहभागीदारीमुळे ओएनडीसी (ONDC) वापरणाऱ्या सर्व खरेदीदारांना स्नॅपडीलच्या उत्तम आणि किफायतशीर मालाचे विस्तृत पर्याय सहज व अखंड उपलब्ध होतील.

ओएनडीसी (ONDC) द्वारे सुरुवातीचे ऑर्डर्स अजमेर (राजस्थान), गुरुदासपूर (पंजाब), अलिगढ (उत्तरप्रदेश), इंदौर (मध्यप्रदेश), काकीनाडा (आंध्रप्रदेश), अमरावती (महाराष्ट्र) यांसारख्या शहरांमधून आल्या आहेत आणि  त्या प्रामुख्याने बेडशीट, टॉवेल, साठवणुकीची भांडी, स्वयंपाकघरातील भांडी व साहित्य अशा घरगुती उत्पादनांवर केंद्रित आहेत.

Pune: India's leading e-commerce platform Snapdeal today announced that it has started accepting orders through the Open Network for Digital Commerce (ONDC).

भारतातील ऑनलाइन संधींचा विस्तार करण्यावर आणि अधिक समावेशक ई-कॉमर्स इकोसिस्टम तयार करण्यावर जो ओएनडीसी (ONDC) चा भर आहे तो  स्नॅपडीलच्या शहरी वापरकर्ते आणि ब्रॅंड्सच्या पलीकडे जाऊन ई-कॉमर्स वाढवण्याच्या लक्ष्याशी सुसंगत आहे. स्नॅपडीलवर सूचीबद्ध केलेली बहुतेक उत्पादने १००० रुपयांच्या आतील किंमतींची आहेत आणि उत्तम गुणवत्तेच्या व किफायतशीर उत्पादनांसह वापरकर्त्यांच्या कार्यात्मक गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेली आहेत.

ओएनडीसी (ONDC) सोबतच्या या सहभागीदारीचा एक भाग म्हणून ओएनडीसी (ONDC) द्वारे येणाऱ्या खरेदीदारांना घरगुती व स्वयंपाकघरातील आवश्यक उत्पादनांचा समावेश असलेले मोठे कॅटलॉग उपलब्ध होईल. स्नॅपडील त्याच्या गृहोपयोगी, फॅशन, सौन्दर्य व वैयक्तिक काळजी या तीन प्रमुख श्रेणींमध्ये प्रवेश वाढवण्याच्या प्रक्रियेमध्येसुद्धा आहे. फॅशन श्रेणीमध्ये मुले, महिला आणि पुरुषांसाठी कपडे, पादत्राणे आणि अॅक्सेसरीज यांचा समावेश असेल. अॅक्सेसरीज मध्ये वॉलेट, बेल्ट, सन ग्लासेस आणि घडयाळी यांसारख्या जलद विक्री होणारी उत्पादने समाविष्ट आहेत. वैयक्तिक काळजी श्रेणीमध्ये त्वचेची काळजी, केसांची निगा, तोंडाची काळजी घेणारी उत्पादने, दुर्गंधीनाशक उत्पादने जसे परफ्यूम आणि डिओडरंट यांचा समावेश असेल तर सौन्दर्य श्रेणीमध्ये लिपस्टिक, नेलपॉलिश आणि डोळ्यांच्या मेकअपसह अनेक विविध मेकअप उत्पादनांचा समावेश असेल.

स्नॅपडील ओएनडीसी (ONDC) सोबतच्या या सहभागीदारीच्या माध्यमातून भारताचे लघु आणि मध्यम उद्योजक, विक्रेते आणि उदयोन्मुख ब्रँड्सना भारतातील ग्राहकांशी संपर्क साधवून त्यांचा व्यवसाय वाढवू शकेल.

स्नॅपडील मार्केट प्लेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हिमांशु चक्रवर्ती म्हणाले, “लाखो लघु आणि मध्यम उद्योगांदवारे भारताची सेवा करण्याचा एक दशकाहून जास्त अनुभव असलेल्या स्नॅपडीलला भारताच्या मोठ्या बाजारपेठेत सेवा देण्यासाठी काय आवश्यक आहे याची अनोखी आणि सखोल माहिती आहे. आता आम्ही ओएनडीसी (ONDC) वर थेट जात असताना आम्ही आमच्या विश्वासाचा पुनरुच्चार करू इच्छितो की, भारतातील विद्यमान रिटेल उद्योजकांना, विशेषतः एमएसएमईंना, ऑनलाइन संधी स्विकारण्यासाठी सक्षम करणे हा भारतासाठी समाजातील सर्वात मोठ्या  वर्गाला डिजिटल लाभांश मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. ओएनडीसी (ONDC) टीमकडून मिळणाऱ्या तत्पर आणि व्यापक समर्थनाबाबतही आम्ही खास सांगू इच्छितो आणि आम्ही भारताच्या मूल्याची किंमत जाणणाऱ्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी ही भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक आहोत.”

ओएनडीसी (ONDC) चे मुख्य कार्यकारी अधिकारी टी. कोशी म्हणाले, “स्नॅपडील  एमएसएमईंवर विशेष लक्ष केंद्रित करून देशभरातील इतर व्यापाऱ्यांसह ओएनडीसी (ONDC) च्या नेटवर्कमध्ये सामील झाल्याबद्दल आम्ही उत्साही व आनंदी आहोत. मोठ्या आणि लहान उद्योगांना समान संधी प्रदान करण्याच्या ओएनडीसी (ONDC) च्या सर्व समावेशक अजेंडाच्या अनुषंगाने व त्यास पूरक आहे.”

युनिकॉमर्स या ई-कॉमर्सला सक्षम करणाऱ्या व्यासपीठानुसार, आता भारतातील मोठ्या शहरांच्यापलीकडे शेकडो टीअर २ आणि ३ शहरांमध्ये आणि लहान शहरांमध्ये ई-कॉमर्सची खऱ्या अर्थाने व चांगली वाढ झाली आहे. २०२२ मध्ये टीअर २ आणि टीअर ३ शहरांचा बाजार हिस्सा अनुक्रमे ४१.५% आणि २१.४% होता. रेड सीअरच्या अहवालानुसार, भारताच्या ८०% पेक्षा जास्त लोकसंख्येला समाविष्ट करणाऱ्या भारतातील टीअर २+ शहरांमधील मध्यम उत्पन्न ग्राहकांची संख्या पाच वर्षात तिप्पट होईल, म्हणजे २०२१ मध्ये अंदाजे ७८ दशलक्षवर असलेली ही संख्या २०२६ मध्ये अंदाजे २५६ दशलक्षवर जाईल.

स्नॅपडील त्याच्या ८६% पेक्षा जास्त ऑर्डर्स मेट्रो शहरांच्या बाहेरून मिळवते, ज्यामध्ये ७२% पेक्षा जास्त ऑर्डर्स लहान शहरे आणि गावांमध्ये राहणाऱ्या खरेदीदारांकडून येतात. मूल्य या गोष्टीवर विशेष लक्ष केंद्रित करून स्नॅपडीलवर विकल्या जाणाऱ्या ९५% पेक्षा जास्त उत्पादनांची किंमत १००० रुपयांपेक्षा कमी आहे. लहान आणि मध्यम विक्रेत्यांना  एका मोठ्या आणि वाढत्या ऑनलाइन बाजारपेठेशी, विशेषतः भारतातील मेट्रो शहरांच्याबाहेर राहणाऱ्या खरेदीदारांबरोबर, जोडण्याचे जे स्नॅपडीलचे सध्याचे लक्ष्य आहे ते ओएनडीसी (ONDC) वरील स्नॅपडीलच्या या लॉंचशी जुडलेले असून त्याच अनुषंगाने कार्य करणारे आहे.

हेही वाचा :

पुणेस्थित ऍग्रीटेक फर्म फार्मईआरपी मधील कर्मचाऱ्यांनी अनाथाश्रमाला दिल्या  भेटवस्तू, आणखी सहकार्याचा हात देण्याचे आश्वासन