स्त्री उद्योजिकांकडून सणासुदीच्या हंगामात कर्जाच्या मागणीत दुप्पट वाढ – निओग्रोथ सर्वेक्षण

75

मुंबई, १७ नोव्हेंबर २०२२ – निओग्रोथ या भारतातीला आघाडीच्या आणि मायक्रो, स्मॉल व मीडियम एंटरप्राइजेसवर (एमएसएमईज) भर देणाऱ्या एनबीएफसीने आज एका सर्वेक्षणाचे अनावरण करत २०२२ मधील सणासुदीच्या हंगामात स्त्रियांतर्फे चालवल्या जाणाऱ्या एमएसएमईजकडून येणाऱ्या कर्जाच्या मागणीत कोविडपूर्व काळातील जुलै ते ऑक्टोबर २०१९ च्या तुलनेत दुप्पट वाढ झाल्याचे दाखवून दिले.

स्त्रियांतर्फे चालवल्या जाणाऱ्या लहान व्यवसायांकडून येणाऱ्या कर्जाच्या मागणीत झालेल्या दुप्पट मागणीमागे अर्थव्यवस्था सुरळीत होत असताना ग्राहकांकडून येत असलेली दमदार मागणी व गेल्या दोन वर्षांत सणांच्या निमित्ताने अभावाने करण्यात आलेला खर्च ही प्रमुख कारणे आहेत.

निओग्रोथच्या माहितीनुसार २०२२ मध्ये बेंगळुरू, हैद्राबाद आणि मुंबईत स्त्रियांतर्फे चालवल्या जाणाऱ्या एमएसएमईजकडून कर्जाची सर्वाधिक मागणी आली.

ऑक्टोबरमध्ये संपलेल्या सणासुदीच्या हंगामात स्त्री कर्जदारांमध्ये इतर क्षेत्रांच्या तुलनेत फॅशन व जीवनशैली, एफ अँड बी, एफएमसीजी आणि रिटेल क्षेत्राकडून कर्जास जास्त चांगली मागणी मिळाली.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) जारी केलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर २०२२ मध्ये युपीआय व्यवहारांची संख्या वार्षिक पातळीवर ७३ टक्क्यांनी वाढली. हे ग्राहक त्यांच्या खर्चासाठी डिजिटल माध्यम वापरत असल्याचे निदर्शक आहे. या महिन्यात भारतीयांनी ७.३ अब्ज युपीआय व्यवहार केले.

निओग्रोथचे संपूर्ण वेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अरूण नायर म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत भारताने वेगवेगळ्या डिजिटल पेमेंट्स पद्धतींमध्ये मोठे स्थित्यंतर अनुभवले आहे. डिजिटल पेमेंट्सचा सोयीस्करपणा आणि वाजवीपणा यांमुळे यंदाच्या सणासुदीतील मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली. कोविड- १९ मुळे दोन वर्ष अतिशय निराशाजनक गेल्यानंतर हा हंगाम संपूर्ण क्षेत्रासाठी सकारात्मक ठरला. पॅन भारतातील ग्राहकांची उत्साही मागणीमुळे विविध व्यवसाय क्षेत्रांत कार्यरत असलेल्या आणि कर्जाची मागणी करणाऱ्या स्त्री एमएसएमईजचे प्रमाण वाढल्याची नोंद आम्ही केली.’

सणांच्या निमित्ताने ३०,००० एमएसएमईजकडून आलेल्या कर्जाच्या मागणीचे विश्लेषण करण्यासाठी आम्ही २०१९ मधील कोविड पूर्व जुलै ते ऑक्टोबर २०१९ या कालावधीची या वर्षातील याच कालावधीशी तुलना केली.

२०१९ प्रमाणेच २०२२ मधील सणांच्या कालावधीत मिळालेल्या कर्जाच्या एकंदर मागणीत प्रमुख शहरे आघाडीवर होती. निओग्रोथच्या डेटानुसार २०२२ मध्ये कर्जाची सर्वाधिक मागणी करणाऱ्या पहिल्या तीन शहरांत बेंगळुरू, हैद्राबाद व मुंबईचा समावेश होता. त्याशिवाय विजयवाडा, अहमदाबाद आणि कोलकाता या शहरांतूनही चांगली मागणी मिळाली.

एफएमसीजी आणि रिटेल क्षेत्रातील एमएसएमईजकडून २०२२ च्या सणांच्या काळात २०१९ च्या याच कालावधीच्या तुलनेत कर्जाची दुप्पट मागणी आली. ग्राहकोपयोगी वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर्सकडून येणाऱ्या कर्जाच्या गणीत ७० टक्के वाढ झाली. त्याशिवाय फॅशन, जीवनशैली क्षेत्रात या वर्षी एमएसएमई कर्जात २०१९ च्या तुलनेत ४० टक्क्यांची वाढ झाली.

निओग्रोथ भारतातील २५ शहरांतील ७०+ क्षेत्रांच्या कर्जाच्या गरजा पूर्ण करते. कंपनीने आतापर्यंत १ अब्ज डॉलर्स कर्जाचे वाटप करत १ लाखापेक्षा जास्त नागरिकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम केला आहे.