स्ट्राटाची इंडिया लॅन्ड व ग्लोबल ग्रुपसोबत धोरणात्मक भागीदारी पुण्यामध्ये नवीन गुंतवणूक संधी शोधणार

64
Strata

पुणे११ जुलै२०२३ : भारतातील आघाडीचा तंत्रज्ञान सक्षम कमर्शियल रिअल इस्टेट (सीआरई) गुंतवणूक प्लॅटफॉर्म स्ट्राटाने इंडिया लॅन्ड व ग्लोबल ग्रुप या महाराष्ट्रातील दोन आघाडीच्या कमर्शियल विकासकांसोबत धोरणात्मक भागीदारी केल्याची घोषणा केली आहे. या भागीदारीमुळे स्ट्राटासाठी संपत्ती पुरवठा वाढेल आणि या क्षेत्रात त्यांची उपस्थिती अधिक जास्त विस्तारेल.

या भागीदारीमार्फत पुण्यातील हिंजवडीमध्ये ग्रेड-ए ऑफिस संपत्तीसाठी पहिल्या टप्प्यात १५० कोटी रुपयांपेक्षा जास्त उभारण्याची स्ट्राटाची योजना आहे. कमर्शियल रिअल इस्टेट क्षेत्रातील दोन प्रमुख विकासकांसोबत धोरणात्मक भागीदारी येत्या वर्षात महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील स्ट्राटाची उपस्थिती अधिक जास्त मजबूत करेल. महाराष्ट्र व तामिळनाडूमध्ये इंडिया लॅन्ड आणि ग्लोबल ग्रुप यांच्या मालकीच्या अनेक वेगवेगळ्या कमर्शियल प्रॉपर्टीज आहेत.

पुण्यातील प्रॉपर्टीचा पहिला टप्पा हिंजवडीमध्ये आहेहे ठिकाण अतिशय धोरणात्मक दृष्टिकोनातून निवडण्यात आले असून एकूण जागा १,२०,००० चौरस फीटपेक्षा मोठी आहे. या संपत्तीमधून १२ – १३% इंटर्नल रेट ऑफ रिटर्न (आयआरआर) आणि ८ – ९% रेंटल उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.  हिंजवडी आयटी पार्क सुरु झाल्यानंतर हे ठिकाणी एक प्रमुख गुंतवणूक केंद्र बनले आहे.  ही प्रॉपर्टी एका सर्वात जास्त मागणी असलेल्या ठिकाणी असून त्याच्या आजूबाजूला उत्तमोत्तम पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध आहेत. पुण्यातील सर्व प्रमुख उपनगरांपर्यंत सहज पोहोचण्याची सुविधा असल्यामुळे हिंजवडी हे या क्षेत्रातील सर्वाधिक मागणी असलेल्या ठिकाणांपैकी एक आहे.

ही संपत्ती दक्षिण भारतातील एक प्रमुख कमर्शियल रिअल इस्टेट विकासक इंडियालॅन्ड यांचा एक भाग आहे. मुंबईपुणेकोईम्बतूर आणि चेन्नईमध्ये अनेक प्रीमियम संपत्तीची मालकी असल्यामुळे इंडियालॅन्डसोबत भागीदारीमुळे महाराष्ट्र व तामिळनाडूमध्ये स्ट्राटाच्या उपस्थितीचा विस्तार होईलअधिक जास्त गुंतवणूकदारांना कमर्शियल संपत्तींमध्ये अंशात्मक गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होतील.

स्ट्राटाचे सह-संस्थापक व सीईओ श्री. सुदर्शन लोढा यांनी सांगितलेआमच्या हिंजवडी पुणे ऑफिस प्रॉपर्टीसाठी इंडियालॅन्ड आणि ग्लोबल ग्रुपसोबत धोरणात्मक भागीदारी केल्याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. पुण्यातील सर्वाधिक वेगाने विकसित होत असलेला भाग म्हणून हिंजवडी कायमच आमच्या रडारवर होते. या प्रख्यात भागीदारांचे साहाय्य आणि आम्ही उपलब्ध करवून देत असलेली गुंतवणूक संधी पाहताआम्हाला खात्री आहे की आमच्या गुंतवणूकदारांना आमच्याकडून उत्तम मूल्य प्रदान केले जाईल. पुण्यामध्ये अत्याधुनिक ऑफिस जागांची मागणी पूर्ण करण्याबरोबरीनेच आम्ही आमचे स्थान अधिक मजबूत करू व आमच्या गुंतवणूकदारांसाठी प्रीमियम गुंतवणुकीच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करवून देऊ.”

इंडियालॅन्डप्रमाणेच ग्लोबल ग्रुप हा एक प्रतिष्ठित औद्योगिक बांधकाम समूह आहे.  औद्योगिक पार्क विकासबिल्ट-टू-सूट लीज पर्यायभू अधिग्रहणप्रकल्प व्यवस्थापन आणि वेयरहाऊस लॉजिस्टिक्स यांच्यासह विविध क्षेत्रांमध्ये ते तज्ञ आहेत. या कंपनीकडे १० मिलियन चौरस फीटपेक्षा जास्त प्री-लिज्ड औद्योगिक व कमर्शियल संपत्ती असून त्या पुण्यात व राज्यात इतरत्र आहेत.

या धोरणात्मक भागीदारीमुळे स्ट्राटाइंडियालॅन्ड आणि ग्लोबल ग्रुप यांचा सखोल अनुभवउद्योगक्षेत्राविषयीचे ज्ञान आणि आजवर सिद्ध झालेली कामगिरी हे एकत्र आले आहेत. या बळावर पुण्यात हिंजवडीमध्ये अशी एक प्रीमियर ऑफिस प्रॉपर्टी उभारण्याचे या भागीदारांचे उद्दिष्ट आहे जी व्यवसाय क्षेत्राच्या नवनवीन वाढत्या गरजा पूर्ण करेल.

इंडियालॅन्डचे सीईओ श्री. सलईकुमारन यांनी सांगितलेएक सर्वात प्रमुख प्रॉपटेक प्लॅटफॉर्म स्ट्राटासोबत भागीदारी केल्याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या भागीदारीमुळे आम्ही ही अतिशय आकर्षक गुंतवणूक संधी अजून जास्त गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवू शकू आणि त्यांच्या एकंदरीत वृद्धी वाटचालीत सहभागी होऊ शकू. नजीकच्या भविष्यकाळात बाजारपेठेत जे सादर करण्याची आमची इच्छा आहे त्याचा शुभारंभ या संपत्तीपासून होत आहे.”  

ग्लोबल ग्रुपचे कार्यकारी संचालक श्री. हरीश हिंगोरानी यांनी पुढे सांगितले, “ज्याचे दरवाजे बंद आहेत अशा तांत्रिक क्षेत्रात खूप मोठी रिटेल गुंतवणूक करण्याच्या संधी आमच्यासाठी खुल्या होण्याच्या दृष्टीने ही भागीदारी नक्कीच एक महत्त्वाची पायरी आहे. या भागीदारीमुळे आम्हाला आमची संसाधने मजबूत करता येतील व आमच्या वृद्धीचा वेग वाढवता येईल. या भागीदारीबद्दल आम्ही सुदर्शन आणि त्यांच्या टीमचे आभारी आहोत. भविष्यकाळातील आमची वाटचाल यशस्वी ठरेल याची आम्हाला पक्की खात्री आहे.”