चेन्नई : स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कं. लि. या भारतातील आघाडीच्या आरोग्य विमा कंपनीने आर्थिक वर्ष २३ मध्ये मध्ये १२,९५२ कोटी रुपयांचा ग्रॉस रिटन प्रीमियम (जीडब्ल्यूपी) नोंदवला असून त्यात गेल्या वर्षातल्या याच कालावधीच्या तुलनेत १३ टक्क्यांची वाढ झाली आहे. ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षात स्टार हेल्थचा करोत्तर नफा (पीएटी) ६१९ रुपयांवर गेला असून आर्थिक वर्ष २२ मध्ये कंपनीने १०४१ कोटी रुपयांचे नुकसान नोंदवले होते.
संचालक मंडळाने आज श्री. आनंद रॉय यांची प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती केल्याचे जाहीर केले. श्री. रॉय यांना भारतीय विमा आणि बँकिंग क्षेत्राचा दोन दशकांचा अनुभव असून ते २००६ मध्ये स्टार हेल्थची स्थापना झाल्यापासून कंपनीशी निगडीत आहेत. त्यांनी कंपनीमध्ये आतापर्यंत विविध पदे भूषवली असून त्यात व्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी संचालक आणि प्रमुख विपणन अधिकारी पद यांचा समावेश आहे.
संचालक मंडळाने श्री. व्ही जगन्नाथन यांची मंडळाच्या नॉन- एक्झक्युटिव्ह अध्यक्षपदी नियुक्ती केली.
‘मला हे सांगताना आनंद होत आहे, की मी कंपनीमध्ये नॉन- एक्झक्युटिव्ह अध्यक्षपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून विमा क्षेत्रात पाच दशकांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. कंपनी उभारणीचा आजपर्यंतचा प्रवास परिपूर्ण आणि हृदयस्पर्शी होता. स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीची सुरुवात झाली, तेव्हा स्वतंत्र आरोग्य विमा कंपनीची संकल्पना नाविन्यपूर्ण होती आणि आरोग्य विम्याचा वापरही नगण्य होता. आरोग्य विम्याविषयी, स्वतःचे आरोग्य आणि आर्थिक स्वास्थ्य जपण्याविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज आम्हाला वाटली. आज स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या विकासाबरोबरच हे उद्दिष्ट बऱ्याच अंशी साध्य होताना पाहायला मिळत आहे. या महत्त्वाच्या कामाची धुरा आणि पदाची जबाबदारी आनंद यांच्याकडे सोपवताना मला समाधान वाटत आहे. मला खात्री आहे, की स्टार हेल्थ इन्शुरन्स श्री. आनंद रॉय यांच्या नेतृत्वाखाली नवनवीन उंची गाठण्यासाठी सज्ज आहे. आज मी हे अभिमानाने सांगू शकतो, की मी हे ध्येय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे साध्य केले आहे,’ असे श्री. व्ही जगन्नाथन म्हणाले.
स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे नवनिर्वाचित मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. आनंद रॉय म्हणाले, ‘स्टार हेल्थमधील नव्या भूमिकेविषयी मी आनंदित आहे आणि भारावून गेलो आहे. या महान कंपनीला प्रगतीच्या पुढच्या टप्प्यात नेण्याची मिळालेली जबाबदारी हा माझा सन्मान आहे. आमच्यासाठी आर्थिर वर्ष २२- २३ चांगले होते आणि त्यादरम्यान आम्ही तिमाही पातळीवर चांगला विकास साध्य केला. रिटेल बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्यावर, एकत्रित ऑपरेटिंग गुणोत्तर कमी करण्यावर तसेच चॅनेल व एजंट नेटवर्क विकसित करण्यावर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे. या वर्षात आम्ही काही नाविन्यपूर्ण उत्पादने लाँच केली व त्याला देशभरातील ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. आमच्या विकास धोरणातही शाखांच्या माध्यमातून कंपनीचे अस्तित्व बळकट करण्यावर आणि अधिक चांगली ग्राहक सेवा देण्यासाठी नेटवर्क हॉस्पिटलमधील अस्तित्व विस्तारण्यावर भर देण्यात आला आहे. आर्थिक वर्ष २३ मधील एकत्रित गुणोत्तर आर्थिक वर्ष २२ मधील ११७.९ टक्क्यांवरून ९५.३ टक्क्यांपर्यंत सुधारले आहे.’
आगामी वर्षांतही रिटेल आरोग्य विमा क्षेत्रावर आमचा प्रमुख भर असेल. नाविन्यपूर्ण उत्पादने आणि डिजीटायझेशनच्या माध्यमातून ग्राहक सेवा उंचावण्यासाठी यापुढेही आम्ही भरीव गुंतवणूक करत राहू. स्टार हेल्थ ब्रँड देशाच्या सर्व भागांत प्रस्थापित आहे. भविष्यात विकास आणि विस्तार क्षेत्रातील नव्या संधी आम्ही शोधत राहू व भारतात आरोग्य विम्याची व्याप्ती वाढवण्यासाठी योगदान देत राहू असे श्री. रॉय म्हणाले.
रिटेल विमा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करत मोठ्या शहरांपासून दुर्गम प्रदेशांपर्यंत सर्व ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यास प्राधान्य देणाऱ्या स्टार हेल्थने आर्थिक वर्ष २३ मध्ये ११,९४८ कोटी रुपये रिटेल आरोग्य प्रीमियम नोंदवला असून आर्थिक वर्ष २२ च्या तुलनेत त्यात १८ टक्के वाढ झाली आहे. ३१ मार्च २०२३ रोजी भारतीय सर्वसाधारण विमा क्षेत्रातील स्टार हेल्थचा रिटेल आरोग्य बाजारपेठेतील हिस्सा ३४ टक्के आहे.
आर्थिक वर्ष २२ मधील ऑपरेटिंग खर्च ते जीडब्ल्यूपी गुणोत्तर १६.० टक्क्यांवरून आर्थिक वर्ष २३ मध्ये १५.९ टक्क्यांवर आले आहे. कंपनीने या वर्षात १.५ x च्या नियामक आवश्यकतेच्या तुलनेत २.१४x दमदार सॉल्व्हन्सी गुणोत्तर साध्य केले आहे.
स्टार हेल्थकडे वैविध्यपूर्ण वितरण नेटवर्क असून त्यात दमदार डिजिटल चॅनेल्स, आघाडीचे बँकान्शुरन्स भागीदार, एजन्सी चॅनेल, कॉर्पोरेट एजंट, ब्रोकर्स, पॉइंट ऑफ सेल्स पर्सन्स (पीओएस), विमा विपणन संस्था, वेब अग्रीगेटर्स व थेट व्यवसायांचा समावेश आहे.
स्टार हेल्थने हॉस्पिटल्ससह आपली भागिदारी विस्तारली असून कंपनीचे भारतातील नेटवर्क १४,२०३ हॉस्पिटल्सपर्यंत पसरलेले आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २३ मध्ये पॅन भारतातील ८३५ शाखा कार्यालयांच्या माध्यमातून आपले अस्तित्व बळकट केले आहे.