सोलिस यानमार च्या वेबसाईटवर ट्रॅक्टरची किंमत जाहीर करणारा पहिला बहुराष्ट्रीय ब्रँड

66
Solis is the first multinational brand to publish tractor prices on Yanmar's website

पुणे, २४ मार्च २०२३ : सोलिस यानमार च्या वेबसाईटवर ट्रॅक्टरची किंमत जाहीर करणारा पहिला बहुराष्ट्रीय ब्रँड. उत्पादन विकत घेण्यासाठी पारदर्शक वातावरण निर्माण करणे हे कोणत्याही व्यावसायिक संस्थेचे सर्वात मोठे लक्ष्य असते. विशेषतः ट्रॅक्टर उद्योगात कृषी-अर्थव्यवस्थेत अधिक सरलता आणण्याची शेतकऱ्यांची मागणी असते आणि त्यांना ट्रॅक्टरच्या किमतीबाबत अधिक स्पष्टता हवी असते. शेतकऱ्यांचा विश्वास अधिक उंचीवर नेण्यासाठी जागतिक ४ डब्ल्यूडी ट्रॅक्टर तज्ञ असलेल्या सोलिस यानमार ने क्रांतिकारी दृष्टिकोनाचा अंगीकार केला असून तो आपल्या अधिकृत वेबसाईटवर किमती दाखविणारा पहिला बहुराष्ट्रीय (एमएनसी) ब्रँड बनला आहे. ट्रॅक्टर उद्योगातील या महत्त्वाच्या घडामोडीत सोलिस यानमार शेतकऱ्यांना खुशियां आपकी, जिम्मेदारी हमारी याची हमी देईल आणि अधिक पारदर्शकतेसह आपला आवडता ट्रॅक्टर निवडण्याची संधी त्यांना देईल.

Solis is the first multinational brand to publish tractor prices on Yanmar's website

सोलिस यानमारने उद्योगात अगोदरच अनेक वैशिष्ट्यपूर्ण पावले उचलली आहेत उदा. ‘सोलिस प्रॉमिस’मध्ये शेतकऱ्यांना ५ वर्षांची वॉरंटी आणि ५०० तासांचे ऑईल चेंज कालावधी यांचे आश्वासन दिलेले असते. त्यांच्या संकेतस्थळावर सोलिस यानमार ट्रॅक्टरच्या किमती जाहीर करण्याच्या परिवर्तनकारी पावलामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी प्रक्रियेत अधिक हमी आणि भरवसा मिळेल. त्यामुळे भारतीय ट्रॅक्टर उद्योगात भविष्य हे आताच आहे याची खात्री त्यांना पटेल. किमतीतील ताजी माहिती व्हेरिएंटच्या पातळीपर्यंत मिळेल, याची निश्चिती कंपनीने केली आहे जेणेकरून शेतकरी www.solis-yanmar.com येथे लॉग इन करून सर्वोत्तम शक्य किमती थेट कंपनीकडून जाणून घेऊ शकतील. सोलिस यानमार देशात आपले चॅनेल नेटवर्क झपाट्याने वाढवत असून शेतकऱ्यांशी अत्यंत घनिष्टतेने संबंधित आहे. या अत्याधुनिक डिलरशिपमधून कंपनीच्या जपानी तंत्रज्ञानाने संचलित प्रगत ट्रॅक्टरची श्रेणीच दिसून येते शिवाय दर्जेदार ट्रॅक्टर सेवेसाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनीही त्या सुसज्ज आहेत.

या वैशिष्ट्यपूर्ण घडामोडीबद्दल आपले विचार मांडताना इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटे़डचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. रमण मित्तल म्हणाले, सोलिस यानमारचा स्थापनेपासूनचा प्रवास हा असामान्य असा राहिलेला आहे. ट्रॅक्टरची खरेदी हा कोणत्याही शेतकऱ्याच्या जीवनातील सर्वात मोठ्या निर्णयांपैकी एक असतो ज्यात किमतीबाबत अत्यंत पारदर्शकतेची आवश्यकता असते. आपल्या अधिकृत संकेतस्थळावर ट्रॅक्टरच्या किमती जाहीर करून सोलिस यानमार हा भारतीय ट्रॅक्टर उद्योगातील परिवर्तनाच्या एका रोमांचक टप्प्याचे नेतृत्व करणारा पहिला बहुराष्ट्रीय ब्रँड ठरेल. शेतकऱ्यांना जे मिळायला पाहिजे तेच त्यांना मिळेल याची त्यातून हमी मिळेल. जपानी तंत्रज्ञानाच्या १०० वर्षांच्या तज्ञतेवर संचालित होणारे सोलिस प्रॉमिस आम्ही अगोदरच शेतकऱ्यांच्या सर्वोच्च समाधानासाठी देऊ करतो आणि जागतिक ४ डब्ल्यूडी तज्ञ ही आमची स्थिती आणखी मजबूत करत आहोत. आमच्या ट्रॅक्टरमधून प्रीमियम तंत्रज्ञान देऊ करण्यासाठी आमच्या अमर्याद दृष्टिकोनावर आम्ही कायम आहोत. त्यामुळे ‘खुशियां आपकी, जिम्मेदारी हमारी’ याची हमी शेतकऱ्यांना मिळेल.