सोनी मराठी वाहिनीवर नवी मालिका ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

48

पुणे : सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ ही नवी थरारक मालिका  प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येते आहे.  या मालिकेत प्रेक्षकांचे आवडते इन्स्पेक्टर भोसले आणि जमदाडे आपल्याला निराळ्या अंदाजात पाहता येणार आहेत. निरनिराळ्या व्यतिरेखांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री अश्विनी कासार ही या मालिकेतून पुनरागमन करताना दिसणार आहे. अभिनेत्री अश्विनी कासार पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. एसीपी अनुजा हवालदार असे तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. सोबतच  रुपल नंद ही सुद्धा या मालिकेत पुनरागमन करताना दिसते आहे. मोहिनी दुभाषी असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असणार आहे. या मालिकेचे लेखक चिन्मय मांडलेकर, दिग्दर्शक भीमराव मुडे आणि निर्माती मनवा नाईक यांनी केले आहेत. ही मालिका १ मे पासून सोम. ते शनि. रात्री १०.३० वा. सोनी मराठी वाहिनीवर सुरु होणार आहे तेव्हा पहायला विसरु नका.  

सध्याचे तरुण एका वेगळ्याच जाळ्यात अडकले आहेत. ते जाळं म्हणजे ऑनलाईन गेमिंगचं. नकळत या जाळ्यात सगळे गुंतले जात आहेत. झटपट पैसे जिंकण्याच्या आशेने या ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात सगळे अडकत आहेत. त्यातून होणार्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी त्यांना आणखीन मोठ्या गुन्ह्यांच्या आहारी जावं लागतं आहे. यातून चोरी, सिरियल किलिंग या गुन्ह्याचे प्रमाणही वाढतं आहे. त्यासाठीच महाराष्ट्र पोलीस दलात ‘स्पेशल ऑपरेशन स्क्वॉड’ नेमण्यात आलं आहे. त्याचा भाग इन्स्पेक्टर भोसले, जमदाडे आणि एसीपी अनुजा असणार आहेत. ते कशा प्रकारे या गुन्ह्याला आवरण्याचा आणि गुन्हेगारांना शिक्षा करण्याचा प्रयत्न करतील, हे आपल्याला पाहायला मिळेल.      

निरनिराळ्या चित्रपटांमधून आणि मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे हरीश दुधाडे  प्रेक्षकांच्या लाडक्या, इन्स्पेक्टर भोसले या व्यक्तिरेखेत  पुन्हा दिसणार आहेत. चंद्रलेखा जोशी हिने आपल्या अभिनायाच्या जोरावर जमदाडे ही व्यक्तिरेखा घराघरांत पोहोचली आहे. त्याबरोबरच पोलिसांच्या आयुष्यातील दुसरी बाजूही  आपल्याला या मालिकेतून पाहता येणार आहे. पोलीस आपल्या कामात नेहमी तत्पर असतात. दिवस-रात्र आपल्या कामाला महत्त्व  देणारे आपल्या कुटुंबाला देण्यासाठी पुरेसा वेळ त्यांच्याकडे नसतो. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ मालिकेतून नेहमी आपल्या कामात तत्पर असलेल्या पोलिसांच्या वैयक्तिक आयुष्यात येणाऱ्या अडचणींवरही  भाष्य केले जाणार आहे.