सोना मशिनरीने केला बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेडचा प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण

37

पुणे : सोना मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड भारतातील अवजड कृषी यंत्रे आणि उपकरणांचे उत्पादन, अभियांत्रिकी, स्थापना आणि ती चालू करून देण्याच्या धान्य आधारित डिस्टिलरी ईपीसी क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. हल्लीच या कंपनीने बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेडच्या मिर्झापूर युनिटमधील ग्रेन हँडलिंगसिस्टिमचा प्रोजेक्ट यशस्वीपणे पूर्ण केला.

यामध्ये नव्या उपकरणांचे इन्स्टॉलेशन, कामातील बदल आणि उपकरणे सुरु करून देणे यांचा समावेश होता. हा प्रोजेक्ट बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेडच्या मिर्झापूर प्लान्ट युनिटमध्ये ग्रेन हँडलिंग सिस्टिमच्या मिलिंग सेक्शन्सचे आणि संपूर्ण अनलोडींगचे रिइंजिनीयरिंग आणि त्याचा अभ्यास करणे व आवश्यक तितकी क्षमता मिळवत असताना प्रोजेक्ट ऑपरेशन्स अबाधितपणे सुरु ठेवणे याच्याशी संबंधित होता.

धान्य आधारित डिस्टिलरी उद्योगक्षेत्रातील आघाडीची ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर म्हणून सोना मशिनरीला आवश्यक तितके क्षमता आउटपुट मिळवून देण्याची आणि ग्रेन हँडलिंग सिस्टिममध्ये आधीच्या व्हेंडर्सनी केलेल्या कामांमुळे उभ्या राहिलेल्या समस्यांचे निवारण करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

विलक्षण अभियांत्रिकी कौशल्ये आणि प्रोफेशनल टीमने केलेले काम यांच्या बळावर सोना मशिनरीला ग्राहकाने आखून दिलेल्या अतिशय मर्यादित वेळेत देखील काम पूर्ण करणे शक्य झाले.

सोना मशिनरीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री. वासू नरेन यांनी सांगितले, “प्लान्टमध्ये भेडसावत असलेल्या समस्यांचे निवारण करण्यात बलरामपूर चिनी मिल्स लिमिटेडची मदत करण्यात आम्ही यशस्वी झालो याचा आम्हाला खूप आनंद होत आहे.

समस्या दूर करण्यासाठी आमच्या टीमने अथक मेहनत घेतली आणि आवश्यक तपशिलांप्रमाणे नवी इन्स्टॉलेशन्स आणि बदल करण्यात आले. आता हा प्लान्ट यशस्वीपणे कार्यरत आहे, आमचे ग्राहक त्यांचे आवश्यक क्षमता आउटपुट मिळवत आहेत याचा आम्हाला खूप आनंद होत आहे.”