सोनालिका ने किसान दिनाच्या निमित्ताने दिली शेतकऱ्यांना सत्य आणि पारदर्शकतेची भेट; आपल्या अधिकृत वेबसाईटवर ट्रॅक्टरची किंमत दाखवणारा पहिला देशांतर्गत ट्रॅक्टर ब्रँड

135

२०२२: भारतीय ट्रॅक्टर उद्योग जगतात अभूतपूर्व ठरणारे पाऊल उचलत सोनालिका ट्रॅक्टरने ट्रॅक्टर उद्योगात सत्य आणि पारदर्शकतेचे मापदंड उंचावत सणांच्या हंगामाचा आनंद शेतकरी समुदायापर्यंत पोचविला आहे.

कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाईटची पुनर्रचना केली असून तिथे शेतकरी आपल्या आवडत्या ट्रॅक्टरच्या किमती पाहू शकतील आणि अधिक मनःशांती मिळवू शकतील.

भारताचा क्रमांक एकचा निर्यात ब्रँड सोनालिका ट्रॅक्टरची ट्रॅक्टर उद्योगाचे वातावरण आणि त्याचे कामकाज यांमध्ये क्रांतिकारक बदल करणारी धाडसी आणि अभूतपूर्व पावले उचलण्याबद्दल ख्याती आहेण् आर्थिक वर्ष २३ मधील दीर्घकालीन सणांच्या आनंदी वातावरणात आणखी भर घालत कंपनीने आपल्या संपूर्ण ट्रॅक्टर श्रेणीच्या किमती आपल्या अधिकृत वेबसाईटवर प्रदर्शित करण्याचे ठरविले आहेण् शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वात मोठे आव्हान असलेल्या ट्रॅक्टरच्या किमतींमध्ये अधिक पारदर्शकता आणणे हे सोनालिकाच्या या पावलामागचे उद्दिष्ट आहेण् या अनोख्या पावलामुळे सोनालिका ट्रॅक्टर्स ही ट्रॅक्टर उद्योगात शेतकऱ्यांच्या अत्यावश्यक गरजांच्या दिशेने एवढी मोठी झेप घेणारी पहिली कंपनी ठरली आहे.

ट्रॅक्टर उद्योगातील किमतींमधील पारदर्शकता ही अनेक दशकांपासून शेतकर्‍यांना भेडसावणारी मोठी समस्या आहेण् भारतातील अग्रगण्य ट्रॅक्टर ब्रँडपैकी एक असलेला सोनालिका ट्रॅक्टर्स हा नेहमीच शेतकरीकेंद्रित ब्रँड राहिला आहेण् शेतकर्‍यांच्या छोट्या.छोट्या अडचणी सोडवण्यासाठी तो आघाडीवर राहिला आहे.

शक्तिशाली इंजिनए नाविन्यपूर्ण ट्रान्समिशन आणि अचूक हायड्रॉलिक्स यांच्यासह कस्टमाईज्ड केलेल्या ट्रॅक्टर्समुळे सोनालिका जगातील १४० देशांमध्ये चैतन्यपूर्ण उपस्थिती नोंदवण्यात यशस्वी ठरली आहे किमतींबाबत अधिक स्पष्टतेसोबतच पुनर्रचित अधिकृत वेबसाईट लाँच केल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात सुटकेचा निरूश्वास टाकू शकतील आणि सत्य आणि भरवशाने परिपूर्ण होऊन आपले आवडते ट्रॅक्टर घरी आणण्याच्या प्रक्रियेला गती देऊ शकतील.

या महत्त्वाच्या प्रसंगी आपले विचार मांडताना सोनालिका ट्रॅक्टर्सचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. रमण मित्तल म्हणाले आजचे शेतकरी प्रगतीशील आहेत आणि वेगाने वाढणाऱ्या डिजिटलायझेशनमुळे त्यांना चांगली माहिती असते ट्रॅक्टर खरेदी करण्याच्या निर्णय प्रक्रियेत किमतींची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते मात्र किमतींबाबतची पारदर्शकता हे ट्रॅक्टर उद्योगामधील काही आव्हानांपैकी एक राहिले आहे.

आमच्या ट्रॅक्टर रेंजच्या किमती आमच्या अधिकृत वेबसाईटवर मांडताना आम्ही रोमांचित आहोत जेणेकरून आर्थिक वर्ष २३ मधील दीर्घकालीन सणांचा आनंद संपूर्ण शेतकरी समुदायापर्यंत पोहोचेलण् भारतीय ट्रॅक्टर उद्योगात हे पाऊल अभूतपूर्व आहे आणि ट्रॅक्टर खरेदीच्या प्रक्रियेत ते अधिक पारदर्शकता आणेल यामुळे शेतकऱ्यांना भरवसा आणि मनःशांती लाभेल तसेच त्यांच्या गरजेनुसार योग्य मॉडेल निवडताना त्यांना मदत होईल.