पुणे , १६ डिसेंबर २०२२ : भारतातील ट्रॅक्टर निर्यात करणारा सर्वात मोठा ब्रँड, सोनालिका ट्रॅक्टर्स, हा सातत्याने अतुलनीय कामगिरी करणाऱ्या अत्याधुनिक तांत्रिक घडामोडींसहल सज्ज असतो. विशिष्ट प्रदेशांवर केंद्रीत असलेल्या आपल्या धोरणाच्या माध्यमातून सोनालिका ट्रॅक्टर्सने आर्थिक वर्ष २०२३ च्या केवळ ८ महिन्यांत आतापर्यंतच्या सर्वात जलद १ लाख एकत्रित ट्रॅक्टर विक्रीचा टप्पा पार केला आहे. यामध्ये एप्रिल-नोव्हेंबर २०२२ दरम्यान नोंदविलेल्या समर्थ अशा ११.२ टक्के वायटीडी (या दिवसापासूनचे वर्ष) वाढीचा समावेश आहे. त्यामुळे या कालावधीत उद्योगाच्या अंदाजे ८.८ टक्के वायटीडी वाढीलाही मागे टाकले आहे. वर्षानुवर्षे आपल्या विक्रीच्या कामगिरीमध्ये वेगाने सुधारणा करत सोनालिका गेल्या ६ वर्षांपासून (आर्थिक वर्ष २०१८– २०२३) एक लाख ट्रॅक्टरची विक्री करत आहे.
सोनालिका ट्रॅक्टर्सने सर्वात पहिल्यांदा २०१८ या आर्थिक वर्षाच्या १२ महिन्यांमध्ये एक लाख ट्रॅक्टर विक्रीची शानदार कामगिरी केली होती. तिच्या टीमने केलेले सूक्ष्म नियोजन आणि कस्टमाईज्ड उत्पादन पोर्टफोलिओमुळे कंपनीला चालू आर्थिक वर्षात या विक्रमात आणखी सुधारणा करणे शक्य झाले आहे. कंपनीचे धोरणात्मक उपक्रम योग्य दिशेने जात असल्याचाच हा पुरावा आहे. सोनालिकाने उचललेले प्रत्येक पाऊल, मग ते उत्कृष्ट उत्पादन असो किंवा प्रक्रिया असो, हे आपल्या सर्व ग्राहकांना किफायती शेती समृद्धीची हमी देण्याच्या तिच्या ध्येयावर केंद्रित असते.
या कामगिरीबद्दल आपले विचार मांडताना, इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. रमण मित्तल म्हणाले, आम्ही केवळ ८ महिन्यांत आमची आतापर्यंतची सर्वात वेगवान अशी एक लाख ट्रॅक्टर विक्री नोंदवली आहे, हे सांगताना मला अभिमान वाटतो. आम्हाला बाजारपेठेची असलेली समज आणि शेतकऱ्यांशी असलेला अचूक संबंध यांच्या जोरावर हे घडले आहे. एके काळी ५०,००० ट्रॅक्टर विक्रीचे उद्दिष्ट बाळगण्यापासून गेली ६ वर्षे सातत्याने एक लाख ट्रॅक्टर विक्रीपर्यंतचा आमचा प्रवास हा जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर बाजारपेठ असलेल्या भारतात तसेच जगभरात आम्ही आमची आश्वासने पूर्ण करत आहोत याची साक्ष देतात. सध्याच्या शेतीच्या वातावरणात शेतीचे यांत्रिकीकरण हा अधिक उत्पादकता आणि सातत्यपूर्ण उत्पन्नाकडे नेणारा मार्ग आहे, हे शेतकऱ्यांना आता पटत आहे. त्याच प्रमाणे उत्पादनांमध्ये सुधारणा करणे हे आता केवळ सणासुदीच्या हंगामापुरते मर्यादित राहिलेले नाही आणि उत्पादनांमध्ये बदल करण्याचा काळही लक्षणीय प्रमाणात कमी झाला आहे. ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासासाठी आम्ही त्या सर्वांचे आभारी आहोत. जगभरातील शेतकऱ्यांसाठी आमच्या कटिबद्धतेचे आम्ही पालन करत राहू, याचीही आम्ही हमी देतो.