सोनालिकाने डिसेंबर ’ २२ मध्ये १०५७१  ट्रॅक्टर विक्री नोंदवून ४१.७ टक्के वाढ नोंदवली

77
पुणे  जानेवारी २०२३ : वर्ष २०२२ –२३ या संपूर्ण आर्थिक वर्षात मिळालेल्या मजबूत गतीच्या पाठबळावर भारताचा क्रमांक एकचा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड सोनालिका ट्रॅक्टर्सने २०२३ हे नवीन वर्ष आणि आर्थिक वर्ष २३ च्या चौथ्या तिमाहीची सुरूवात अचंबित करणाऱ्या कामगिरींनी केली आहेकंपनीने शेतकऱ्यांच्या अपेक्षांपेक्षा अधिक कामगिरी करत डिसेंबर २०२२ मध्ये १०,५७१ ट्रॅक्टर विक्रीची नोंद केली आहेयात जबरदस्त अशा ४१. टक्के देशांतर्गत वाढीचा समावेश असून उद्योगाच्या वाढीला (अंदाजे २६ टक्के ) वाढीला तिने मागे टाकले आहेएकूण मिळून कंपनीने वर्ष २०२२ –२३ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या ते तिसऱ्या तिमाहीच्या काळात ११८४४९ ट्रॅक्टर विक्रीची नोंद केली असून आपल्या पुढील यशस्वी वाटचालीचा पाया घातला आहे तसेच शेतकऱ्यांसाठी हमखास समृद्धीची हमी दिली आहे.

भारत तसेच परदेशांतील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या जीवनात अमर्याद प्रगतीची भर घालण्याच्या मुलभूत विश्वासासह सोनालिका ट्रॅक्टर्स देशभरातील तळागाळातील शेतकऱ्यांशी सक्रियपणे जोडलेली आहेती शेतकऱ्यांना यांत्रिक शेतीचा अंगीकार करण्याची प्रेरणा देतेसोनालिकाचे कस्टमाईज्ड ट्रॅक्टर्स हे शक्तिशाली इंजिनइंटेलिजंट ट्रांसमिशन आणि मजबूत हायड्रॉलिक सिस्टिम्स यांच्यासह असल्यामुळे शेतीतील सुलभतेची हमी मिळते आणि पिकाचे कमाल उत्पादन आणि शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्नाची खात्री होते.

या नवीन कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करताना इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्रीरमण मित्तल म्हणालेशेती क्षेत्रात तंत्रज्ञानाचे महत्त्व आणि अंगीकार झपाट्याने वाढत आहेआमच्या प्रगती तंत्रज्ञानाने युक्त ट्रॅक्टर आणि उपकरणांद्वारे शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्हाला आनंद आहेशेतीतील यांत्रिकीकरणाची मागणी केवळ पारंपरिक हंगामांपुरती मर्यादित राहिली आहेयाचा हा पुरावा आहेआमच्या ब्रँडवर प्रत्येक शेतकऱ्याने दाखविलेला विश्वास हा सामूहिकरीत्या कृषी क्षेत्रात आमची स्थिती आणखी बळकट करण्यासाठी चालना देण्याचे काम करतो.

मित्तल पुढे म्हणाले की आता २०२३ मध्ये प्रवेश करतानाआमचे वेगवाने प्रयोगशीलतेचे अभियान पूर्णपणे सज्ज झाले असून आम्ही शेतकऱ्यांपर्यंत उत्तमोत्तम शेती तंत्रज्ञान पोहोचवत राहूशेतीतील यांत्रिकीकरणाच्या वाढीला पुढे नेण्यासाठी सर्व हंगामांमध्ये आणि सर्व ठिकाणी सर्वाधिक उत्पादन मिळावेयासाठी त्यांना आधार देण्याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत.”