सोनालिकाची फेब्रुवारीत आतापर्यंतची वायटीडी सर्वाधिक १,३७,३४४, ट्रॅक्टरची विक्री

59
Solis is the first multinational brand to publish tractor prices on Yanmar's website

पुणे, मार्च २०२३ : भारताचा क्रमांक एकचा ट्रॅक्टर निर्यात ब्रँड सोनालिका ट्रॅक्टर शेतकऱ्यांच्या दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी सुधारणात्मक पावले उचलण्यासाठी नेहमीच प्रेरित असतो. या दृष्टिकोनामुळे शेतकऱ्यांची मने जिंकणाऱ्या सोनालिकाने फेब्रुवारी २०२३ मध्ये आत्तापर्यंतची सर्वाधिक वायटीडी (ईयर टू डेट) १,३७,३४४  ट्रॅक्टरची विक्री करून बाजारपेठेत आतापर्यंतचा सर्वाधिक १४.१ टक्के वाटा मिळविला आहे. आर्थिक वर्ष २०२३ च्या शेवटच्या टप्प्यात जाताना अशी असामान्य कामगिरी केल्यामुळे आपल्या प्रगत ट्रॅक्टरच्या माध्यमातून सतत बदलणाऱ्या गरजा पूर्ण करण्यातील आणि शेतकऱ्यांसोबत वाढण्यातील सोनालिकाचे यश दिसून येते.

Sonalika Clocks highest ever YTD Feb’23 overall sales of 1,37,344 tractors

भारतातील शेती ही अत्यंत गुंतागुंतीची असून सोनालिका हा आपल्या स्थापनेपासूनच शेतकरीकेंद्रित ब्रँड ठरला आहे जेणेकरून त्यांच्या मर्यादित संसाधनांमध्ये सुद्धा त्यांच्या शेतीची उत्पादकता आणि त्यांचे उत्पन्न वाढत राहील. प्रत्येक हंगामामध्ये विक्रमी एकूण उत्पादन तसेच सरकारकडून मिळणारी मदत यामुळे शेतकऱ्यांकडे रोखीची उपलब्धता वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आर्थिक वर्ष २०२४ मध्ये येणाऱ्या हंगामात उत्तम वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

या नव्या कामगिरीविषयी इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. रमण मित्तल म्हणाले, उत्पादनाचा दर्जा हा शेतकऱ्यांची पहिली आणि सर्वात महत्त्वाची गरज असल्याचे विचारात घेऊन आम्ही सातत्याने प्रयोग करत आहोत. शेतकऱ्यांकडून यांत्रिकीकरणाचा झपाट्याने अंगीकार होत असल्याचे पाहून आम्ही भारावून जातो. रब्बी हंगामातील अन्य धान्य उत्पादन सलग चौथ्या वर्षी वाढले आहे आणि आश्चर्य म्हणजे काही बाजारपेठामध्ये त्यांची किंमत किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त आहे. दुसरीकडे लागवडीचा खर्च जवळपास तोच आहे. या अनुकूल घटकांमुळे शेतकऱ्यांकडे खर्च करण्यासाठी पैसे येतील आणि त्याचीच पुनरावृत्ती खरीप हंगामात होईल अशी अपेक्षा आहे. सोनालिकामध्ये आमच्याकडे मागणीचा अंदाज बांधण्यासाठी समर्थ यंत्रणा आहे. नव्या युगातील तंत्रज्ञानाचा वापर करण्याची आमची सर्व धोरणे ही शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष गरजांना अनुरूप आहेत.