सोनालिकाकडून किसान पुणे २०२२ मध्ये टायगर डीआय ७५ ट्रॅक्टर सादर

74

पुणे१७ डिसेंबर २०२२ : भारताचा क्रमांक १ चा ट्रॅक्टर निर्यातक ब्रँड सोनालिका ट्रॅक्टर्स आक्रमकपणे नवीन प्रयोग करत असताना नेहमी शेतकऱ्यांना समोर आणि केंद्रस्थानी ठेवतो. किसान पुणे २०२२ मध्ये प्रगत तंत्रज्ञानाने सज्ज असलेले ट्रॅक्टर्स सादर करताना कंपनी रोमांचित आहे. पीआयईसीसी पुणे येथे कंपनीच्या भव्य सादरीकरणाच्या अग्रभागी सोनालिका टायगर डीआय ७५ ४डब्ल्यूडी हा ट्रॅक्टर आहे. हा अत्याधुनिक ट्रॅक्टर असून तो सीआरडीएस या अत्यंत नवीन तंत्रज्ञानाने कस्टमाईज केलेला आहे. हे क्रांतिकारक तंत्रज्ञान पर्यावरणाला अनुकूल असून त्यात सोनालिका पॉवर आणि १० टक्के  अधिक इंधन कार्यक्षमतेचा दुहेरी फायदा मिळतो. तसेच तो ट्रेम स्टेज ४  निकषांचे पालन करतो. सोनालिकाने शेतकऱ्यांच्या उत्पादकतेत वाढ करून उत्पन्नातही भर घालणारे ३ प्रगत ट्रॅक्टर्सही यावेळी सादर केले. यात सिकंदर आरएक्स ४७ ४डब्ल्यूडीसिकंदर आरएक्स,  टायगर डीआय ३० तसेच सोनालिका छत्रपती डीआय ७४५ यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील पीक आणि मातीच्या विशेष गरजा लक्षात घेऊन त्यांची रचना करण्यात आली आहे.

टायगर डीआय ७५ सीआरडीएस हा ५७-७५ एचपी रेंजमध्ये तीन पॉवर रेंजेससह मल्टी-मोड फंक्शनलिटीसह उपलब्ध असेल. त्यामुळे महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या मातीमध्ये वापरासाठी तो उपयुक्त ठरेल. हा प्रीमियम ट्रॅक्टर शक्तिशाली अशा ४ सिलिंडरच्या ४,७१२ सीसी इंजिनने युक्त असून तो कमाल २९० एनएम  एवढा टॉर्क आणि २,२०० किग्रॅ हायड्रॉलिक लिफ्ट प्रदान करतो. यात १२एफ प्लस १२आर शटल टेक ट्रांसमिशनइंटेलिजेंट कंट्रोल सिस्टिम आणि ५जी हायड्रॉलिक कंट्रोल सिस्टिम यांसारखे प्रगत तंत्रज्ञान आहेत. यामुळे अधिक उत्पन्न तसेच शेतीतील अधिक उत्पादकतेची हमी मिळते. येथून पुढे आगामी ट्रेम स्टेज ४ उत्सर्जन निकषांचे पालन करण्यासाठी नव्या सीआरडीएस तंत्रज्ञानाचा आधार सोनालिका ट्रॅक्टर्सला मिळणार आहे.

सोनालिका ट्रॅक्टर्सचे विक्री व मार्केटिंग विभागाचे प्रमुख व अध्यक्ष श्री. विवेक गोयल म्हणाले, “सोनालिकामध्ये तंत्रज्ञानातील प्रत्येक नव्या प्रयोगाचा मुख्य भर हा असामान्य कामगिरी आणि अधिकाधिक शेती उत्पादकता पुरवण्यावर असतो. किसान पुणे २०२२ हे महाराष्ट्रातील प्रमुख प्रदर्शन आहे. तिथे आम्ही केवळ आमचे नाविन्यपूर्ण उत्पादनच सादर करतो असे नाही तर शेतकऱ्यांकडून अमूल्य प्रतिक्रियाही घेतो. त्यामुळे आम्हाला उत्पादने व सेवांमध्ये सुधारणा करण्यास मदत होते.  आमचा नवा सीआरडीएस तंत्रज्ञानाने युक्त टायगर डीआय ७५ ४डब्ल्यूडी हा पर्यावरणाला अनुकूल आहे आणि शेतकऱ्यांचे समृद्ध भविष्य व वाढीव उत्पन्न याबद्दलची आमची कटिबद्धता त्यात प्रतिबिंबित होते.

सोनालिका ट्रॅक्टर्सचे सीनियर झोनल हेड श्री. कुलदीप सिंह म्हणाले, “शेतीतील उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाचा अंगीकार करण्याच्या बाबतीत महाराष्ट्रातील शेतकरी प्रगतिशील आहेत. प्रीमियम क्रोम ट्रीम्सडीआरएलसह दोन बॅरेल हे़डलॅम्पसआरामदायक आसन आणि मल्टी-फंक्शन कन्सोलसह सोनालिका टायगर सीरिज ही प्रादेशिक शेतकऱ्यांसाठी अस्सल आनंद ठरेल.

किसान पुणे हे एक अग्रगण्य कृषी प्रदर्शन असून ते कृषी व्यावसायिककृषी उपकरणे उत्पादकधोरण निर्माते आणि सरकारी अधिकारी यांना एकत्र येऊन भारतातील कृषी क्षेत्रात शेतीला अधिक फलदायी बनवण्यासाठी विचारमंथन करण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देते. हे प्रमुख प्रदर्शन १४ ते १८ डिसेंबर २०२२ दरम्यान पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर (पीआयईसीसी) येथे आयोजित करण्यात आले आहे.