सेव्हन अ साईट फुटबॉल स्पर्धा आजपासून

122
पुणे, ८ जानेवारी २०२३ : सिटी प्रिमियर लीगच्या पाचव्या पर्वाला आज रविवारपासून सुरुवात होत आहे. मोशी येथील सिटी स्पोर्टस अरेना येथे ही स्पर्धा पार पडले. तीनशेहून अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील.
स्पोर्टस फोंडेशन पुणेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या सीटी एफसी, पुणे संघाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धा ९, ११, १३, १५ वर्षांखालील आणि १५ वर्षांवरील अशा विविध पाच वयोगटात होणार आहे.
पाचही वयोगटातील सामने ही प्रथम साखळी आणि नंतर बाद फेरी पद्धतीने होतील. प्रत्येक गटात चार संघाचा समावेश करण्यात आला असून, प्रत्येक संघाला तीन सामने खेळणे अनिवार्य असेल.
ही स्पर्धा केवळ आठवड्याच्या अखेरीस म्हणजे शनिवार, रविवार होणार आहे. एकूण चार शनिवार-रविवार हे सामने होतील. स्पर्धेतील अंतिम सामने २६ जानेवारीस होतील. थोडक्यात स्पर्धेतील सामने ८, १४, १५, २१, २२ आणि २६ जानेवारी असे सहा दिवस होतील.
सर्व संघांना खेळायची संधी मिळावी, तसेच, खेळाडू आणि त्यांच्या शाळा यामध्ये समतोल साधला जावा यासाठी स्पर्धेतील सामने केवळ शनिवार, रविवार खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला, असे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगांवकर यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन होईल. या वेळी जीजीआयएसच्या संचालिका भारती भगवानी आणि बंगलूर एफसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार ताम्हाणे उपस्थित राहतील.