सेनहायजरकडून लघु व मध्‍यम आकाराच्‍या सहयोगी जागांसाठी टीमकनेक्‍ट बार सोल्‍यूशन्‍सची घोषणा

20

इंडिया, २०२३ – सेनहायजर या सहयोग व अध्‍ययन सुलभ करणाऱ्या प्रगत ऑडिओ तंत्रज्ञानासाठी पहिल्‍या पसंतीच्‍या कंपनीने लघु व मध्‍यम-आकाराच्‍या मीटिंग रूम्‍स आणि सहयोगी जागांसाठी सर्वात स्थिर ऑल-इन-वन डिवाईसेसह युनिफाईड कम्‍युनिकेशन्‍स ए/व्‍ही बार बाजारपेठेत प्रवेश केला आहे. विशेष लाँच समारोहामध्‍ये सेनहायजर टीमकनेक्‍ट फॅमिलीचा भाग असलेल्‍या टीमकनेक्‍ट (टीसी) बार सोल्‍यूशन्‍सचे अनावरण करण्‍यात आले.

सेनहायजरचे टीमकनेक्‍ट फॅमिली ग्राहकांच्‍या गरजा, कॉन्‍फरन्‍स रूम आकार व कन्फिग्‍युरेशनची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या युनिफाईड कम्‍युनिकेशन्‍स सोल्‍यूशन्‍सची वैविध्‍यपूर्ण श्रेणी आहे. हे सर्व सोल्‍यूशन्‍स मीटिंग अनुभवामध्‍ये वाढ करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहेत. समस्‍या-निवारण क्षमता, युजर-अनुकूल इंटरफेसेस् आणि टिकाऊ दर्जावर लक्ष केंद्रित करण्‍यासह प्रत्‍येक उत्‍पादनामध्‍ये हॉलमार्क विश्‍वसनीय सेनहायजर ऑडिओ क्‍वॉलिटी समाविष्‍ट आहे.

टीमकनेक्‍ट फॅमिलीमधील नवीन भर टीसी बार सोल्‍यूशन्‍स लघु (टीमकनेक्‍ट बार एस) किंवा मध्‍यम आकाराच्‍या (टीमकनेक्‍ट बार एम) मीटिंग व सहयोगी जागांसाठी पर्यायांसह येतात. टीसी बार सोल्‍यूशन्‍स खरे समस्‍या निवारक आहेत, ज्‍यामध्‍ये सुलभ सेटअप, ब्रॅण्‍ड अॅग्‍नोस्टिक इंटीग्रेशन, सुलभ व्‍यवस्‍थापन व नियंत्रण, उच्‍च व्हिडिओ क्‍वॉलिटी, सुरक्षितता व शाश्‍वतता असे फायदे मिळतात. टीसी बार एस मध्‍ये ४ मायक्रोफोन्‍स व २ स्‍पीकर्स आहेत, तर टीसी बार एम मध्‍ये ६ मायक्रोफोन्‍स व ४ स्‍पीकर्स आहेत. दोन्‍ही डिवाईसेस कोणत्‍याही मीटिंग व्‍यासपीठाशी सहजपणे एकीकृत होतात आणि सेनहायजरमधील इतर सुसंगत उत्‍पादनांशी कनेक्‍ट करता येऊ शकतात.

या विकासाबाबत आपले मत व्‍यक्‍त करत सेनहायजर इंडियाच्‍या सेल्‍स, बिझनेस कम्‍युनिकेशनचे संचालक नवीन श्रीधर म्‍हणाले, ”सेनहायजरमध्‍ये आम्‍हाला युनिफाईड कम्‍युनिकेशनच्‍या भविष्‍याला नवीन आकार देण्‍याप्रती आमच्‍या कटिबद्धतेचा अभिमान वाटतो. टीमकनेक्‍ट फॅमिली या दृष्टिकोनाला आकार देण्‍यामध्‍ये महत्त्‍वाची राहिली आहे, तसेच रूमचा आकार, कन्फिग्‍युरेशन असो किंवा कम्‍युनिकेशन गरजा असोत ग्राहकांच्‍या विविध गरजांची पूर्तता करण्‍यासाठी सोल्‍यूशन्‍सची सर्वसमावेशक श्रेणी देते. मीटिंग अनुभव अधिक उत्‍साहित करण्‍याप्रती आमचा प्रवास अविरत आहे, ज्‍यामुळे आम्‍ही नाविन्‍यतेसंदर्भात अग्रस्‍थानी आहोत. टीसी बार सोल्‍यूशन्‍सपासून टीमकनेक्‍ट सिलिंग सोल्‍यूशन्‍सपर्यंत आम्‍ही ईडब्‍ल्‍यू-डीएक्‍ससह प्रत्‍येक सेटिंगसाठी बारकाईने सोल्‍यूशन्‍स डिझाइन केले आहेत. ईडब्‍ल्‍यू-डीएक्‍स हा आमचा डिजिटल वायरलेस आविष्‍कार आहे, जो मीटिंग रूम्‍स, क्‍लासरूम्‍स व व्‍यापक कॉर्पोरेट कॅम्‍पसपर्यत नाविन्‍यतेचा आमचा वारसा विस्‍तारित करतो.”

टीसी बार सोल्‍यूशन्‍स अद्वितीय स्‍वातंत्र्य व स्थिरता देतात, ज्‍यामुळे ग्राहकांना त्‍यांच्‍या मीटिंग रूम आकारानुसार योग्‍य व्हिडिओ कॉन्‍फरन्सिंग डिवाईस निवडता येते. वॉल माऊंट, वेसा माऊंट, टेबलटॉप किंवा फ्रीस्‍टॅण्डिंग अशा विविध माऊंटिंग पर्यायांसह रूम डिझाइनमध्‍ये टीसी बार सहजपणे माऊंट करता येतो. एक्‍स्‍टेन्‍शन माइक्‍स आणि/किंवा दुसरा एक्‍स्‍टर्नल यूएसबी कॅमेराची भर करण्‍यासाठी डॅन्‍टे वापराचा पर्याय डिवाईसला अधिक स्‍केलेबल बनवतो.

शक्तिशाली फुल-रेंज स्टिरिओ स्‍पीकर्ससह त्‍यांचा सुधारित डायरेक्टिव्‍हीटी पॅटर्न व सानुकूल पॅसिव्‍ह रॅडियटर्स आवाज सुस्‍पष्‍टपणे ऐकू येण्‍याची आणि उल्‍लेखनीय इंटेलिजिबिलिटीची खात्री देतात. एकीकृत करण्‍यात आलेले बीमफॉर्मिंग तंत्रज्ञान प्रेझेन्‍टर्सना एकसंधी ट्रान्झिशनची खात्री देते आणि जागेमध्‍ये हालचाल व कन्फिग्‍युरेशन करण्‍याची मुभा देते. बिल्‍ट-इन डीएसपी, तसेच सेनहायजर कंट्रोल कॉकपीटच्‍या माध्‍यमातून ऑडिओ सेटिंग्‍ज समायोजित करण्‍याचा पर्याय वापरकर्त्‍यांना रूममधील आकर्षकता अधिक सानुकूल करण्‍याची संधी देते. कन्‍टेन्‍टला साजेसे सर्वोत्तम ऑडिओसाठी टीसी बार्स ऑटोमॅटिक कॉन्‍फरन्‍स व म्‍युझिक मोड स्विचसह येतात.

टीम कनेक्‍ट बार सोल्‍यूशन्‍समध्‍ये मीटिंग तंत्रज्ञनामधील आधुनिक प्रगत सुधारणा आहेत, ज्‍या आधुनिक हायब्रिड मीटिंग्‍ज व लेक्चर्सचा स्‍तर वाढवत व्हिडिओला नव्‍या उंचीवर नेतात. ४के अल्‍ट्रा एचडी कॅमेरा एआय वैशिष्‍ट्ये जसे ‘ऑटो फ्रेमिंग’ व ‘पर्सन टिलिंग’ यासह अधिक सुधारण्‍यात आला आहे, ज्‍यामुळे दूर असलेल्‍या सर्व सहभागींना रूममधील प्रत्‍येकाला सहजपणे पाहता येते. प्रगत एआयसह लहानात लहान गेस्‍चर्स व चेहऱ्यांवरील हावभाव कॅप्‍चर केले जातात, ज्‍यामधून मीटिंगमध्‍ये अधिक सहभाग असण्‍याची खात्री मिळते.

सेनहायजरच्‍या ओपन व ॲग्‍नोस्टिक इकोसिस्‍टम तत्त्वामुळे टीसी बार्स आमच्‍या सहयोगींच्‍या अनेक प्रमुख मीडिया कंट्रोल सिस्‍टम्‍सशी सुसंगत देखील आहेत. यासंदर्भात प्रमाणन सध्‍या प्रक्रियेत आहेत. मुलभूत समायोजनांसाठी विविध वैशिष्‍ट्ये जसे झूम, पर्सन टिलिंग रिमोट कंट्रोलवर समाविष्‍ट करण्‍यात आली आहेत.

सुरक्षिततेच्‍या संदर्भात टीसी बार सोल्‍यूशन्‍स उद्योगातील सर्वोत्तम सुरक्षितता पद्धतींचे पालन करतात आणि त्‍यांचे कन्फिग्‍युरेशन पासवर्डसह सुरक्षित आहेत. सेनहायजर कंट्रोल कॉकपीट, तसेच थर्ड पार्टी मीडिया कंट्रोल सिस्‍टम्‍सना कम्‍युनिकेशन उद्योग मानक ट्रान्‍सपोर्ट लेयर सिक्‍युरिटी १.२ चा वापर करत एनक्रिप्‍टेड आहे आणि गैरवापरापासून सुरक्षित आहे. टीसी बार्समध्‍ये आयईईई ८०२.१x नेटवर्क ऑथीन्टिकेशन देखील आहे आणि अर्थातच, अतिरिक्‍त गोपनीयतेसाठी लेन्‍स कॅपचा समावेश करण्‍यात आला आहे.

टीमकनेक्‍ट फॅमिलीमध्‍ये टीसी बार सोल्‍यूशन्‍सचा समावेश करण्‍यासह सेनहायजर आता ग्राहकांना मोठ्या व मध्‍यम आकाराच्‍या रूम्‍स, तसेच लहान मीटिंग्‍जसाठी इंटेलिजण्‍ट स्‍पीकरसह साह्य करण्‍याकरिता फॅमिलीच्‍या विश्‍वसनीय सिलिंग मायक्रोफोन सोल्‍यूशन्‍सची पूरक आणखी एक पर्याय प्रदान करते. प्रत्‍येक उत्‍पादन स्‍वतंत्र सोल्‍यूशन म्‍हणून कार्य करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. तसेच इतर सुसंगत सेनहाजयर किंवा थर्ड-पार्टी उत्‍पादनांसह विकास करत आणि सुलभ कन्फिग्‍युरेशन व मॉनिटरिंगसाठी सेनहायजर कंट्रोल कॉकपीटच्‍या क्षमतेचा लाभ घेत अतिरिक्‍त कव्‍हरेज किंवा वैशिष्‍ट्ये प्राप्‍त करता येऊ शकतात.

भारतीय बाजारपेठेत टीसी बार एस ची किंमत ९९,००० रूपये आणि टीसी बार एम ची किंमत १,४९,००० रूपये आहे. उत्‍पादन भारतीय बाजारपेठेत Q4 २०२३ पासून उपलब्‍ध असेल.