सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी साजरा केला हनुमान जन्मोत्सव

36
Students of Suryadatta National School celebrated Hanuman birth anniversary
पुणे : हनुमान जयंतीच्या निमित्ताने सूर्यदत्त नॅशनल स्कुलमधे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी हनुमान चालिसाचे पठण करत भगवान हनुमान आणि भगवान राम यांच्या गुणांचे गुणगान करत रॅलीत सहभाग घेतला. त्यांनी भगवान हनुमानाचे गुण आणि मूल्ये प्रदर्शित करणारे पोस्टर्स हातात घेतले होते आणि लोकांना त्यांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. नंतर समाजाच्या  समृद्धीसाठी आणि सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
इयत्ता नववीच्या अरत्रिका उमप हिने रामायण आणि महाभारत ही महाकाव्य सध्याच्या उद्योजकीय युगात कशी सुसंगत आहेत आणि जगभरातील व्यवस्थापन संस्थांमध्ये कशी वापरली जातात, याबद्दल सांगितले. तसेच महाबली हनुमान हे रामायणातील प्रमुख घटक आहेत. त्यांना शक्ती आणि भक्ती यांचे मूर्त रूप म्हणून पाहिले जाते असे सांगितले. विद्यार्थ्यांना या दिवसाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले आणि राम भक्त हनुमानाची मोठ्या संकटात धैर्याने उभे राहण्याची क्षमता आणि त्यांची चिकाटी यावर प्रकाश टाकण्यात आला.
Students of Suryadatta National School celebrated Hanuman birth anniversary
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या संकल्पनेतून संस्थेच्या सहयोगी उपाध्यक्ष स्नेहल नवलखा आणि सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या संचालक शीला ओक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्साहाने उपक्रमात सहभाग नोंदविला. हनुमानाच्या वेशभूषेतील निल जोशी याने त्याच्या बाललीलानी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.