सूर्यदत्त जीवनगौरव व राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा

76
पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या २५ व्या (रौप्य महोत्सवी) वर्धापन दिनानिमित्त दिल्या जाणाऱ्या ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ व सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ घोषित करण्यात आल्याची माहिती ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी दिली.
अक्षरधाम मंदिराचे ज्ञानवत्सल स्वामी महाराज, ज्येष्ठ माध्यम व्यावसायिक विजय दर्डा, राष्ट्रीय मुख्य सल्लागार डॉ. गुलशन राय, बँकिंग व सहकार तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, विधिज्ञ ऍड. सुधाकर आव्हाड, ज्येष्ठ गायक पं. सुहास व्यास, ज्येष्ठ अभिनेते रणजित बेदी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल शहा, डॉ. धीरज शहा (ग्लोबल अवार्ड) यांना ‘सूर्यदत्त जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
अर्थविषयक अर्थक्रांती संस्था, आंतरराष्ट्रीय कलाकार सुदर्शन पटनाईक, संगीतकार अबू मलिक, माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ गुरमित सिंग, सामाजिक कार्यकर्ते शेखर मुंदडा, अध्यात्मिक गुरु सरिताबेन राठी, ट्रेनर अँड कन्सल्टंट ओमी भटनागर, अभिनेता मंगेश देसाई, गिर्यारोहक उमेश झिरपे, अर्थतज्ज्ञ रवींद्र बोरटकर, कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ प्रा. एम. नाझरी (ग्लोबल अवॉर्ड) यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे. यासह अदम्या राज (ग्लोबल अवॉर्ड), डिजिटल इंफ्लून्सर कृष्णराज महाडिक, भूशास्त्र अभ्यासक सोनित सिसोलेकर यांना ‘सूर्यदत्त नॅशनल यंग अचिव्हर अवॉर्ड’, तर ऍप डिझायनर अनोष्का जॉली, मेंटॉर अवि शर्मा, बालकलाकार देशना दुगड यांना ‘सूर्यदत्त लिट्ल मास्टर नॅशनल अवॉर्ड’ देण्यात येणार आहे.
प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनीजी यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून अक्षरधाम मंदिराचे ज्ञानवत्सल स्वामी महाराज, तर विशेष उपस्थित म्हणून पद्मश्री मुरलीकांत पेठकर, पद्मश्री अनुप जलोटा उपस्थित राहणार आहेत. उद्या मंगळवारी (दि. ७) सायंकाळी ६ वाजता सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, बावधन, पुणे येथे हे पुरस्कार सन्मानपूर्वक वितरित केले जाणार आहेत.