सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे आयोजित महाआरोग्य शिबिरात ५०० जणांची तपासणी

39

पुणे, ता. २९ : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात ५०० हुन अधिक विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तपासणी करून घेतली. नेत्र, मधुमेह, रक्तदाब, फिटनेस आदी तपासण्या करण्यात आल्या. प्रसंगी भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. ऑट्स ब्लड सेंटर, इन्फिगो आय केअर हॉस्पिटल तसेच झिपी हेल्थ या संस्थांचे सहकार्य लाभले.

यावेळी विविध संस्थांच्या वतीने प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचा सन्मान व अभीष्टचिंतन करण्यात आले. महाराष्ट्र कला प्रसारिणी सभेचे सचिन इटकर, रिपाइं नेते ऍड. मंदार जोशी, भाजपचे संदीप बुटाला, टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे संदीप खंडेलवाल व वर्षा पिंगळे, राष्ट्रसंचारचे अनिरुद्ध बडवे, सारिका रोजेकर, पुण्यनगरीचे संजय संकपाळ, प्रभातचे प्रवीण पारखी, इंडियन एक्स्प्रेसचे मुरुगेश मुदलियार, संदीप शेट्ये, आज का आनंदच्या भारती बेरी, सकाळचे संतोष गोगावले, दिव्य मराठीचे समीर कदम, लोकमतचे समीर देशमुख, पर्वती टाइम्सचे संजय शिंदे, ऑट्सचे मनोज वाघमारे, इन्फिगोच्या डॉ. मेखला कुलकर्णी यांच्याकडून प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सूर्यदत्त मधील विविध विभागातर्फे सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या.

सचिन इटकर म्हणाले, “प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी माणूस घडविण्याचे काम केले आहे. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला घडविण्याचे काम त्यांनी आजवर केले आहे. ‘मिडास टच’सारखे त्यांचे व्यक्तिमत्व व त्यांच्यातील क्षमता आहे. थॉमस जेफरसन या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाची खरी ओळख जशी व्हर्जिनिया विद्यापीठात होती, अगदी तशीच प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांची ओळख सूर्यदत्तमध्ये आहे.”

अनिरुद्ध बडवे म्हणाले, “नैतिक अधिष्ठानावर आधारित स्वप्न पाहीले आणि ते प्रत्यक्षात आणले असे आपण ‘सूर्यदत्त’ प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या बाबतीत म्हणू शकतो. पुण्याच्या शैक्षणिक परंपरेचा, महात्मा फुले, शिक्षणमहर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या कार्याचा वारसा ते पुढे नेत आहेत.”

ऍड. मंदार जोशी म्हणाले, “विद्यार्थी कार्यासाठी नियमित झोकून देऊन काम करण्याची सरांची वृत्ती आहे. त्यांची धडपड, प्रयत्न आम्ही जवळून पाहत आहोत. सदाशिव पेठेतील सुरुवात ते विद्यापीठाकडे वाटचाल करत असलेला खडतर प्रवास अभिमानास्पद आहे.”

सन्मानास उत्तर देत प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी सर्वांचे आभार मानले. निरपेक्ष प्रेम आणि दृढ नातेसंबंधांचे हे द्योतक आहे. विद्यापीठाचा विचार निश्चित सुरु असून, आपल्या सर्वांच्या सहकार्याने हे ध्येय निश्चित साकार करू. ‘आत्मनिर्भर भारत’साठी ‘सूर्यदत्त’चा सहभाग महत्वाचा राहिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून नुकत्याच झालेल्या जी-२० परिषदेत सहभाग नोंदवला. सदैव सर्वोत्तम करण्याची सूर्यदत्त संस्थेची भूमिका आहे.”

“या प्रवासात माझी धर्मपत्नी सुषमा चोरडिया यांचे सहकार्य अनमोल राहिले आहे. सुषमा आणि कुटुंबियांच्या सहकार्यामुळेच माझ्या हातून हे कार्य घडले. ‘सूर्यदत्त’चे विद्यार्थी जगभर पसरले आहेत. तेच सूर्यदत्तचे नाव सर्वदूर पसरवत आहेत. नुकत्याच झालेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात याची प्रचिती आली,” असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी प्रा. अवसरीकर, संदीप खंडेलवाल, वर्षा पिंगळे, संजय शिंदे, प्रविण पारखी, संजय संकपाळ, भारती बेरी, प्रशांत पितालिया, अक्षित कुशल, नयना गोडांबे, प्रतिक्षा वाबळे, केतकी बापट, शीतल फडके, प्रा. शीतल भुसारी, प्रा. राज कांकरिया, सायली देशपांडे, सविता मटाने, अश्विनी देशपांडे, हर्षवर्धन देशपांडे, प्रा. खुशाली, सविता गांधी, सिद्धांत चोरडिया, अतुल देशपांडे, जसजित कौर, सुमता घोरपडे, डॉ. सिमी रेठरेकर, अधिका मावशी, नेत्रा देशपांडे यांच्यासह विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या वतीने चोरडिया यांना भेटकार्ड देण्यात आले. प्रा. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले.