एप्रिल : ‘सुहागन’ या कलर्सवरील आगामी मालिकेत बघा बिंदिया या आशावादी अनाथ मुलीची कहाणी कठीण काळात आपण नेहमी आधारासाठी आणि रक्षणासाठी आपल्या कुटुंबियांकडे जातो. पण जर आपल्या कुटुंबानेच आपल्याकडे पाठ फिरवली तर? सुहागन या कलर्सवरील आगामी मालिकेत बिंदियाच्या कहाणीतून हाच विषय हाताळला आहे. बिंदिया एक तरुण अनाथ मुलगी आहे जी आपल्या नातेवाईकांच्या कामाचा भार वाहते आहे आणि शिवाय त्या लोकांना तिच्या वाडीलोपार्जित मिळकतीत वाटा देखील हवा आहे.
अशा खडतर परिस्थितीत आणि आपल्या अस्तित्वाच्या प्रश्नाशी झुंजत असूनही बिंदिया निरागस, समजूतदार आणि आशावादी आहे. पायल या आपल्या खोडकर धाकट्या बहिणीच्या खोडयांचा त्रास सहन करत करत ती मोठी बहीण म्हणून तिचा यथायोग्य सांभाळ देखील करत आहे. छोट्या बिंदियाच्या भूमिकेत लोकप्रिय बालकलाकार आकृती शर्मा तर छोट्या पायलच्या भूमिकेत कुरंगी नागराज दिसणार आहे. विवेक बहलची संकल्पना असेलेली रश्मी शर्मा निर्मित ही मालिका 2 मे पासून सुरू होत आहे आणि ती दर सोमवार ते रविवार संध्याकाळी 6:30 वाजता कलर्स वाहिनीवरून प्रसारित करण्यात येणार आहे.
हिंदी मास एन्टरटेन्मेंट, व्हायकॉम18 च्या चीफ कंटेन्ट ऑफिसर मनीषा शर्मा म्हणतात, “कलर्स मध्ये आम्ही अशी वेधक कथानके प्रस्तुत करण्यास प्रतिबद्ध आहोत, जी लोकांना आपलीशी वाटतील. सुहागन मालिकेतून अशीच एक कहाणी सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे, ज्या काहणीत प्रत्येक घरातील भाव-भावनांचे प्रतिबिंब दिसेल. या मालिकेच्या केंद्रस्थानी एक मुलगी आहे, जी स्वतःचे आणि आपल्या धाकट्या बहिणीचे आपल्या वाईट चिंतणाऱ्या नातेवाईकांपासून रक्षण करत आहे. सुहागन एक विचार करायला भाग पाडणारी गोष्ट आहे. या गोष्टीत कुटुंब, नाट्यामधील सख्य आणि प्रतिकूल परिस्थितीत तग धरून राहण्याची चिकाटी यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ही एक नवी कोरी गोष्ट आहे जी पेक्षकांना चटकन आपलीशी वाटेल आणि आम्हाला अशा आहे की, या मालिकेला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळेल.”
उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीवरील या कथानकात बिंदिया (आकृती शर्मा)ची कहाणी आहे. बिंदिया अनेक संकटांना तोंड देत खंबीरपणे उभी आहे, पायल (कुरंगी नागराज) या तिच्या लहान बहिणीला सांभाळणे हे देखील एक कठीण काम आहे. या दोघी बहिणी आपल्या आजारी आजीसोबत राहतात. आपले शेत बाळकवण्याचा आपल्या नातेवाईकांचा कुटिल हेतु अजून त्यांच्या लक्षात आलेला नाही. बिंदिया तिच्यावरील संस्कारांमुळे स्वाभिमानी आणि जबाबदार मुलगी आहे. परंतु तिच्या याच गुणी स्वभावाचा तिचे मामा-मामी आणि आत्या-आतोबा गैरफायदा घेत असतात. आपल्या नातेवाईकांचा कुटिल हेतु आणखी किती काळ तिच्यापासून लपून राहणार? कष्टमय आयुष्यातून बाहेर पडून तिला एका सुंदर जीवनाची वाट सापडेल का?
निर्माती रश्मी शर्मा म्हणते, “सुहागन एक भावनिक पण साधी कौटुंबिक कहाणी आहे. उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीवरील या कथेत एका अशा मुलीची कहाणी आहे, जी आपल्या आई-वडिलांशिवाय आपली धाकटी बहीण आणि प्रेमळ आजी यांचा सांभाळ करून जीवन जगते आहे. भाग्य त्यांच्या क्षमता पारखत राहते आणि अशी संकटेही उभी करते की ज्यात त्यांच्या जीवनाची उलथापालथ होऊन जाते. या मालिकेत प्रेक्षकांना विविध भावनांचा अनुभव घेत येईल. कथानक पुढे कोण-कोणती वळणे घेत जाणार आहे, हे जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत. कलर्सशी आमचे जुने नाते आहे आणि आम्ही यशस्वी मालिका दिल्या आहेत. पुन्हा एकदा यांच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आम्ही या वाहिनीचे आभारी आहोत.”
बिंदियाची भूमिका करत असल्याचा आनंद व्यक्त करताना आकृती शर्मा म्हणाली, “मला वाटते की, सुहागनमधल्या माझ्या व्यक्तिरेखेशी माझे बरेच साम्य आहे. मी बिंदियाची भूमिका करत आहे. परिस्थितीने गांजलेली असूनही ती खूप सकारात्मक आणि खंबीर मुलगी आहे. या निरागस मुलीच्या माझ्या अभिनयाला प्रेक्षकांची कशी दाद मिळते हे पाहण्यास मी उत्सुक आहे. मालिकेतील इतर कसलेल्या कलाकारांसोबत काम करणे माझ्यासाठी रोमांचक असणार आहे.”
कलर्सवरील ‘सुहागन’ मालिकेत बघा दोन बहीणींची हृदयस्पर्शी कहाणी, जी सुरू होत आहे 2 मे रोजी आणि त्यानंतर दर सोमवार ते रविवार संध्याकाळी 6:30 वाजता प्रसारित करण्यात येईल फक्त कलर्सवर.