डीएमआय फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडने (“डीएमआय फायनान्स”) आज विद्यमान गुंतवणूकदार सुमितोमो मित्सुई ट्रस्ट बँक लिमिटेडच्या (“सुमि ट्रस्ट बॅंक”) च्या सहभागासह मित्सुबिशी यूएफजे फायनान्शियल ग्रूप इंकच्या नेतृत्वाखालील ४०० दशलक्ष डॉलरची इक्विटी गुंतवणूक फेरी बंद केल्याची घोषणा केली आहे. या फेरीत प्राथमिक आणि दुय्यम व्यवहारांचा समावेश आहे.
डीएमआय फायनान्स ही वापर, वैयक्तिक आणि एमएसएमई कर्जांसह या उत्पादनांसह निव्वळ डिजिटल कर्ज उपलब्ध करून देते. विक्री आणि अंडररायटिंगपासून ते ग्राहक सेवा आणि संकलनापर्यंत कर्ज देण्याच्या प्रत्येक पायरीचा जास्तीत जास्त पर्याप्त वापर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेते.
डिएमआय फायनान्स स्रोत आणि ग्राहकांना विविध डिजिटल माध्यमांच्या स्रोतांद्वारे ग्राहकांना सेवा देते. विशेषतः सॅमसंग, गुगल पे आणि एअरटेल यांसारख्या आघाडीच्या व्यवसायांसाठी डिएमआय फायनान्स
एम्बेडेड डिजिटल फायनान्स भागीदार आहे. जे संपूर्ण भारतातील त्यांच्या ग्राहकांना विविध आर्थिक उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी डिएमआय फायनान्स सोबत कार्यरत आहेत.
डीएमआय फायनान्स भारतातील ९५% पिनकोड्स पर्यंत पोहोचलेली आहे आणि २५ दशलक्ष ग्राहकांना सेवा देत आहे. आर्थिक वर्ष २०२४ पर्यंत ही ग्राहक संख्या ४० दशलक्षपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. आर्थिक वर्ष २०२४ पर्यंत २.५ अब्जपेक्षा जास्त उत्पादने वितरित होतील असा अंदाज आहे.
डीएमआय फायनान्सला इक्राकडून एए – पतदर्जा मिळालेला आहे आणि आघाडीच्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बँकांचे पाठबळ लाभलेले आहे.
डीएमआय फायनान्सचे सह-संस्थापक आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक शिवाशिष चॅटर्जी म्हणाले: “जगातील आघाडीच्या डिजिटल पायाभूत सुविधांच्या भक्कम आधारावर भारत आज अभूतपूर्व स्थित्यंतराच्या पायरीवर आहे. भारतीय कुटुंबांसाठी आणि लहान व्यवसायांसाठी त्यांच्या वेगाने वाढणाऱ्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी विश्वसनीय भागीदार बनणे हे डीएमआय फायनान्सचे उद्दिष्ट आहे. आमच्या ग्राहकांना रिअल टाइममध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याच्या आमच्या या मोहिमेची मुहूर्तमेढ आम्ही २०१६ मध्ये रोवली होती. या मोहिमेत एमयूएफजी आणि सुमि ट्रस्ट बँकेचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या ग्राहकांना आणि आमच्या गुंतवणूकदारांसाठी आमच्या टीमच्या क्षमतेवर विश्वास दाखवल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.”
डीएमआय फायनान्सचे सह-संस्थापक आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक युवराज सी. सिंग म्हणाले, “ भारतीय वित्तीय बाजारपेठेत पुढील एक- दोन दशकात वाढ होण्याची प्रचंड क्षमता आहे असे आम्हाला वाटते आणि आमची मूल्ये आणि दीर्घकालीन दृष्टीकोन पुढे घेऊन जाण्याच्या दृष्टीने धोरणात्मक गुंतवणूकदार मिळण्यासाठी आम्ही भाग्यवान आहोत. भारतात आजही आर्थिक सेवांचा मोठ्या प्रमाणात लाभ पोहचू न शकलेली लोकसंख्या आहे आणि आर्थिक समावेशकते बरोबरच या बाजारपेठेला बळकटी देणे हे आमचे ध्येय आहे. सर्व भागधारकांना डीएमआय सोबत काम करण्याचा सकारात्मक अनुभव आहे ही आमच्यासाठी हे खूप महत्वपूर्ण गोष्ट आहेआणि यासाठी आम्हाला आणि आमच्या गुंतवणूकदारांना तात्विक आणि धोरणात्मक संतुलन राखणे आवश्यक आहे. त्यांच्या संयमाने आणि आर्थिक बाजारपेठेतील सखोल अनुभवामुळे एमयूएफजी आणि सुमि ट्रस्ट बँक आमच्यासाठी योग्य गुंतवणूकदार आहेत याची आम्हाला खात्री आहे.
एमयूएफजी बँकेच्या जागतिक व्यावसायिक बँकिंग नियोजन विभागाचे प्रमुख आणि व्यवस्थापकीय संचालक मॅसाशिगे नाकाझोनो म्हणाले, “एमयूएफजीसाठी, आशिया ही एक महत्त्वपूर्ण आणि दुसरी घरगुती बाजारपेठ आहे.बँक सुविधा नसलेल्या ग्राहकांपर्यंत डिजिटल वित्तीय सेवांचा विस्तार भक्कम पणे होत असलेला विस्तार आणि संभाव्यता लक्षात घेता हा डिजिटल पायाभूत सुविधांचा रचलेला पाया आणि झपाट्याने वाढत असलेल्या लोकसंख्येचा विचार करता भारत ही आमच्यासाठी सहावी सर्वात अपेक्षित वाढणारी बाजारपेठ आहे. डीएमआय फायनान्स त्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर बाह्य भागीदारीच्या मदतीने एक मजबूत आणि विशिष्ट व्यवसाय मॉडेल तयार करत आहे असा आम्हाला ठाम विश्वास वाटतो. धोरणात्मक भागीदार या नात्याने आमच्या गुंतवणुकीद्वारे डीएमआय फायनान्सच्या वृद्धीला बळकटी देण्यासाठी आणि भारतातील आर्थिक सर्वसमावेशकतेत योगदान देण्यासाठी आम्ही उत्साहित आहोत. डिजिटल आर्थिक बाजारपेठेतील डीएमआय फायनान्सच्या आश्वासक वाटचालीचे सोबती होण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
सुमि ट्रस्ट बँकेचे व्यवस्थापकीय कार्यकारी अधिकारी मासाया नोडा म्हणाले की, “आम्ही या इक्विटी गुंतवणुकीच्या फेरीत सहभागी होणे आणि डीएमआयच्या वृद्धीच्या वाटचालीत डिसेंबर २०२१ मध्ये आमच्या जपानी कंपनीने केलेल्या सुरुवातीच्या गुंतवणुकीनंतर “धोरणात्मक भागीदार” म्हणून योगदान दिल्याचा आम्हाला सन्मान वाटतो.
फिनटेक आणि शेवटच्या मैलापर्यंत पोहोचण्याच्या क्षमतांसह डीएमआयच्या डिजिटल वित्तीय सेवा भारताच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देत राहतील आणि डीएमआयच्या स्वतःच पुढील वाढीचे लक्ष्य गाठेल याचीआम्हाला खात्री आहे . आम्ही डीएमआयला त्यांचा व्यवसाय भागीदार म्हणून सहकार्य करण्यासाठी आणि भारताशी संबंधित व्यवसायाद्वारे डीएमआय सोबत एकत्र येण्यासाठी व्यवसायाच्या संधी निर्माण करण्यास उत्सुक आहोत.”