सीरियो सुपर किंग्स ठरले जीजीपीएल सीझन २ चे विजेते

215

पुणे, २१ नोव्हेंबर,२०२२ : गोयल गंगा प्रीमियर लीग (GGPL) सीझन २, ही नऊ दिवसीय क्रिकेट स्पर्धा नुकतीच संपन्न झाली,ज्यामध्ये सीरियो सुपर किंग्स हा संघ विजेता ठरला. या क्रिकेट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सीझन १ चे गतविजेते प्लॅटिनो सनरायझर्स आणि सीरियो सुपर किंग्स यांच्यात पार पडला. प्लॅटिनो सनरायझर्स ने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्याबदल्यात सीरियो सुपर किंग्स ने पहिल्या डावात १० ओव्हर्समध्ये ७ गडी गमावून १२२ धावांचे लक्ष्य प्लॅटिनो सनरायझर्स समोर ठेवले. धावांचा पाठलाग करताना प्लॅटिनो सनरायझर्स संघ १० ओव्हर्समध्ये ७ गडी गमावून ११३ धावाच करू शकला. सीरियो सुपर किंग्स संघाने हा रोमांचक सामना ९ धावांनी जिंकला आणि सीझन २ चा विजेता ठरला.

प्लॅटिनो सनरायझर्स,इशान्या चॅलेंजर्स, सीरियो सुपर किंग्स, न्यूटाउन नाइट रायडर्स आणि यूटोपिया वारियर्स यासह एकूण पाच संघांनी गोयल गंगा डेव्हलपमेंटच्या नावाने सुरू असलेल्या प्रकल्पांच्या नावावर टीम सदस्य म्हणून कंपनीचे कर्मचारी लीगमध्ये सहभागी झाले होते.

गोयल गंगा डेव्हलपमेंटचे संचालक अनुराग गोयल म्हणाले, “कर्मचाऱ्यांमध्ये छान बाँडिंग निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि तो खूप यशस्वी ठरला. नऊ दिवस चाललेल्या या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूचा जोश आणि उत्साह पाहण्यासारखा होता.”