सीपीएसचे स्पष्टीकरण – अभ्यासक्रमाची मान्यता रद्द करण्याची घोषणा घाईत

28
College-of-Physicians-Surgeons-of-Mumbai-CPS

पुणे , १८ जुलै २०२३ : महाराष्ट्रातील सीपीएस अभ्यासक्रमांची नुकतीच मान्यता रद्द करणे हा असा आदेश आहे जो अवाजवी घाईने, विविध तथ्ये समग्रपणे न पाहता, पडताळणी न करता आणि सीपीएसला समस्या सोडवण्याची संधी न देता पारित करण्यात आला आहे. आमच्या संपूर्ण इतिहासात, आम्ही नेहमी आमच्या विद्यार्थ्यांच्या सर्वोत्तम हितांना प्राधान्य दिले आहे आणि त्यांना उत्कृष्ट पायाभूत सुविधा, अभ्यासक्रम आणि विद्याशाखा प्रदान केल्या आहेत.

११२ वर्षे जुनी संस्था म्हणून आम्ही यापूर्वी अनेक आव्हानांना तोंड दिले आहे आणि त्यावर मात केली आहे. सीपीएस सध्या त्याचे पर्याय शोधत आहे, आणि त्यांना विश्वास आहे की ते या टप्प्यावरही मात करणार. या परिस्थिती ही आम्ही विद्यार्थ्यांना खात्री देऊ इच्छितो आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांना घाबरू नका असे आवाहन करतो. कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन ऑफ मुंबई (सीपीएस), मुंबई आणी भारतातील एक अग्रगण्य वैद्यकीय शिक्षण संस्था आहे, ज्यांनी ४५,००० हून अधिक पदव्युत्तर डॉक्टरांच्या करिअरला आकार देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे, जे वैद्यकीय समुदायातील उत्कृष्टतेचे दीपस्तंभ म्हणून उदयास आले आहे.

सर्जन जनरल सर एच. डब्ल्यू. स्टीव्हनसन यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली १९१२ मध्ये स्थापन झालेली सीपीएस ही भारतातील वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात आघाडीवर आहे. इथे होतकरू वैद्यकीय व्यावसायिकांना विविध पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातात. प्रगत वैद्यकीय प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना सीपीएसमध्ये प्रवेश दिला जातो. सीपीएसची उभारणी शैक्षणिक उत्कृष्टता आणि प्रतिष्ठित नेतृत्वाच्या आधारावर झालेली आहे, उदाहरणार्थ माजी पंतप्रधान श्री. पंडित जवाहरलाल नेहरू, मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर श्री. मोरारजी देसाई, माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील हे येथील मानद फेलो आहेत.

College-of-Physicians-Surgeons-of-Mumbai-CPS

महाराष्ट्र आणि त्याही पलीकडे आरोग्यसेवेला आकार देण्यामध्ये सीपीएसने महत्त्वाची भूमिका पार पाडली असून माता आणि मुलांचा मृत्यूदर कमी करण्यात ती योगदान देत आहे. प्रसिद्ध कार्डियाक सर्जन आणि पद्मभूषण पुरस्कारप्राप्त डॉ. देवीप्रसाद शेट्टी म्हणतात, की मातृत्व आरोग्य सेवेच्या बाबतीत महाराष्ट्राच्या उल्लेखनीय कामगिरीला सीपीएस कारणीभूत आहे.

सीपीएसला मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय) आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची (एनएमसी) मान्यता आहे, यामुळे येथील अभ्यासक्रम वैद्यकीय क्षेत्रातील सर्वोच्च मानकांची पूर्तता करतात याची हमी मिळते. संस्था आणि विद्यार्थी या दोन्हींसाठी परवडणारी फी कायम ठेवत देशभरात आरोग्य शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी संस्थेचे समर्पण हे तिला इतर स्पर्धकांपासून वेगळी करतात.

सार्वजनिक क्षेत्रातील रुग्णालये आणि सरकारी यंत्रणा बळकट करण्यावर सीपीएसचे लक्ष केंद्रित आहे. त्यामुळे माता आणि बाल आरोग्य सेवेमध्ये लक्षणीय सुधारणा झाली असून ती सरकारची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सीपीएस ही संस्था आपला प्रवास पुढे नेत असताना उत्कृष्ट वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून देणे आणि आरोग्य सेवा व्यावसायिकांना घडविणे यासाठी कटिबद्ध आहे.

सीपीएसचे अध्यक्ष डॉ. गिरीश मैंदरकर म्हणाले, आरोग्य शिक्षणाचा देशव्यापी प्रसार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत नवीन सिम्युलेशन लॅबमुळे आमच्या विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि नियंत्रित वातावरणात शिकण्याची संधी मिळेल. त्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये आणि आत्मविश्वास विकसित करण्यात त्यांना मदत होईल.

सिम्युलेशन मॉड्युल प्रसूती आणि स्त्रीरोग, आघात, भूल, आपत्कालीन औषध, बालरोग, आणि बरेच काही मध्ये आलेल्या विविध परिस्थितींचा समावेश करून, प्रशिक्षण संधींची व्याप्ती विस्तृत करेल. आम्हाला खात्री आहे की भारताच्या आरोग्य सेवेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने या नवीन सुविधेचे योगदान महत्त्वाचे ठरेल.

सीपीएसची प्रवेश प्रक्रिया, सीपीएसचे अभ्यासक्रम, डिप्लोमा, फेलोशिप आणि एमबीबीएस नंतरच्या फेलोशिप अभ्यासक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी, https://www.cpsmumbai.org/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. सीपीएसमध्ये एमसीआय मान्यताप्राप्त आणि एनएमसी मान्यताप्राप्त अनेक वैद्यकीय अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यामुळे होतकरू आरोग्यसेवा व्यावसायिकांना दर्जेदार शिक्षण आणि प्रशिक्षण मिळण्याची हमी मिळते.