सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग तर्फे मेगा पूल ऑक्शनसाठी रायडर नोंदणीची सुरुवात

24
L-Eeshan-Lokhande-Center-Veer-Patel-Right-Aashwin-lokhande

पुणे, जुलै २०२३ – सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग या जगातील पहिली फ्रँचाईझी सुपरक्रॉस लीगला भारतातील बहुप्रतीक्षीत सुपरक्रॉस लीगसाठी रायडर नोंदणीची सुरुवात करताना आनंद होत आहे. फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्ट्स क्लब्ज ऑफ इंडियाच्या (एफएमएससीआय) सहकार्याने लीग जगभरातील रायडर्सना सहभागी होऊन सुपरक्रॉसच्या थरारक ट्रॅक्सवर आपले कौशल्य दाखवण्यासाठी, भारतात मोटरस्पोर्ट्सची समीकरणे नव्याने प्रस्थापित करण्यासाठी आणि मनोरंजन, साहस व कडवी स्पर्धा यांचा मिलाफ अनुभवण्यासाठी आमंत्रित करत आहे.

  • आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत एसएक्स/एमएक्स रेसर्सना सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या मेगा ऑक्शन पूलमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
  • रायडर्सना त्यांचे नाव on www.indiansupercrossleague.com वर नोंदवून सर्व माहिती मिळवता येणार
  • लीग प्रमोटर्सना विविध देशांतील मिळून २४६ रायडर्स सहभागी होण्याची अपेक्षा असून त्यापैकी ८८ लीगमध्ये सहभागी होण्यासाठी निवडले जाणार.

वेगवेगळ्या देशांच्या खेळाडूंचे आयएसआरएलच्या पहिल्या सीझनमध्ये स्वागत आहे. जगभरातील गुणवत्तेला वाव देणारे समतोल व्यासपीठ तयार करण्यासाठी संयोजक बांधील आहेत. सहभाग न्याय्य असावा यासाठी भारताबाहेरच्या देशांतील रायडर्सना त्यांच्या राष्ट्रीय क्रीडा संघटना/राष्ट्रीय फेडरेशन्स ऑफ मोटरस्पोर्ट्सकडून एफएमएससीआय आणि एसएक्सआयच्या नावे ना हरकत प्रमाणपत्र आणावे लागणार आहे.

CEAT-ISRL-Racing

सुपरक्रॉस इंडिया प्रा. लि. चे सह- संस्थापक आणि संचालक ईशान लोखंडे म्हणाले, ‘आम्ही जगभरातील फेडरेशन्सपर्यंत पोहोचून त्यांना रायडर पूलसाठी नोंदणी करण्याची व या ऐतिहासिक रायडर लिलावात सहभागी होण्याची संधी मिळेल याची खात्री केली आहे. सुपरक्रॉस रेसिंग लीग हा क्रांतीकारी खेळ आहे आणि आम्हाला आशा आहे, की सुपरक्रॉसच्या दुनियेवर वर्चस्व गाजवण्यासाठी असामान्य रायडर्स याकडे आकर्षित होतील. गुणवत्ता दर्शवण्याची, ट्रॅकवर दर्जेदार कामगिरी करण्याची आणि मोटरस्पोर्ट्सच्या विश्वात भारताला पुढे नेण्याची ही चांगली संधी आहे. ही जबरदस्त संधी चुकवू नका.’

इच्छुक रायडर्सना अधिकृत एसएक्सआयच्या संकेतस्थळावर www.indiansupercrossleague.com दिलेला रायडर नावनोंदणी अर्ज भरून यात सहभागी होता येईल. या अर्जामध्ये रायडर्सना वैयक्तिक माहिती, रेसिंगचा अनुभव, सोशल मीडिया हँडल्स, एनडॉर्समेंट्स आणि कंत्राटाचे तपशील व संबंधित कागदपत्रे पुरवावी लागतील.

नोंदणी करून रायडर्स खेळाडू लिलावात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करतील, जिथे फ्रँचाईझी रायडर्सची त्यांच्या टीमचे रेसिंग लीगमध्ये प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवड करतील. यशस्वी रायडर्सना उच्च पातळीवर स्पर्धा करण्याची आणि राष्ट्रीय मंचावर आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल.

CEAT-ISRL-Racing

एफएमएससीआयच्या सुपरक्रॉस रेसिंग कमिशनचे अध्यक्ष श्री. सुजीत कुमार म्हणाले, ‘सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगसाठी रायडर नोंदणीची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे भारतातील गुणवान रायडर्सना व्यासपीठ मिळेल, शिवाय आंतरराष्ट्रीय रायडर्सच्या सहभागाने देशाला नवी उंची प्राप्त होईल. आंतरराष्ट्रीय रायडर्सच्या सहभागामुळे जागतिक स्तरावर या लीगला स्थान मिळेल व भारतील सुपरक्रॉस रेसिंगची स्पर्धात्मकता वाढेल. विविध रायडर्सना एकत्र पाहाण्यासाठी आणि आगामी हंगामात त्यांच्या रेसिंगचा थरार अनुभवण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’

रायडर नोंदणी केल्यास रेसिंग लीगच्या पहिल्या हंगामात सहभागाची खात्री दिली जाणार नाही. रायडर पूलमध्ये सहभागी होऊन खेळाडू लिलावात फ्रँचाईझी निवडसाठी उपलब्ध असणे आवश्यक आहे. अतिरिक्त माहिती आणि रायडर नोंदणी अर्जासाठी अधिकृत एसएक्सआयच्या संकेतस्थळाला www.indiansupercrossleague.com भेट द्या.

इतिहास घडवण्याची ही संधी चुकवू नका.