सावधान ! चपलांमार्फत कोरोना व्हायरसचा तुमच्या घरात येऊ शकतो

335

करोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे संपूर्ण जग त्रस्त झालं आहे. आतापर्यंत जगात हजारोंच्या संख्येने करोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. यामध्येच अनेक देशांमध्ये लॉकडाउन केल्यामुळे त्याचा परिणाम थेट अर्थव्यवस्थेवरही होताना दिसून येत आहे. भारतातही लॉकडाउन आहे.यातच कोरोनाव्हायरस होऊ नये म्हणून तुम्ही सर्व काळजी घेत आहात. घराबाहेर गेल्यावर मास्क लावत आहात, घरी आल्यावर स्वच्छ हातपाय धूत आहात, कपडे धुवून घेत आहात, तुमच्याजवळील सर्व वस्तू sanitize करून घेत आहात. मात्र चपलांचं काय? चपलांवरही कोरोनाव्हायरस असू शकतो का?

यूएसमधील पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट केरोल विनर म्हणाल्या, “चपलांमार्फत कोरोनाव्हायरस घरात येतो याबाबत अद्याप काही पुरावे सापडले नाहीत. मात्र काही वस्तूंवर 2 ते 3 दिवस व्हायरस राहतो. त्यामुळे कोरोनाव्हायरस असलेले थुंकीचे शिंतोडे चपलांवर उडाले असतील, तर अशा वस्तूंपासून बनवण्यात आलेल्या चपलांवर व्हायरस असू शकतो. त्याबाबत अधिक अभ्यासाची गरज आहे” बहुतेक चपला रबर, प्लास्टिक, चामड्यापासून बनलेले असतात, त्यामुळे त्या कोरोनाव्हायरसचा वाहक ठरू शकतात. तज्ञाच्या मते, “शूज ज्या मटेरियलपासून तयार केले जातात, त्यावर 5 किंवा त्यापेक्षा जास्त दिवस व्हायरस राहू शकतात”

काय खबरदारी घ्याल?

-चपला नेहमी घराबाहेर काढा.

-त्यानंतर हात आणि पाय साबणाने स्वच्छ धुवून घ्या.

-घरात आहे आणि घराबाहेर वापरण्यासाठी वेगवेगळ्या चपला ठेवा.

-घराबाहेर वापरत असलेल्या चपला नियमित स्वच्छ करा.

-ज्या चपला पाण्याने धुणे शक्य नाही, त्या sanitize करा.