सायले येथील ग्रामस्थांनी केला आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश

105

चिपळूण  : विलास गुरव

चिपळूण-संगमेश्वर मतदार संघातील सायले गावातील ग्रामस्थांचा पक्षप्रवेश कार्यक्रम जनसंपर्क कार्यालय, सावर्डे येथे पार पडला. यावेळी कार्यालयात एकच जल्लोष झाला “शेखर सर आगे बडो हम तुम्हारे साथ है”. प्रवेशकर्त्यांचा उत्साह पहाताना सरांनी केलेल्या विकास कामांची, त्यांच्या कामाच्या पद्धतीची अन त्यांच्यावर लोकांच्या असणा-या प्रेमाची एक वेगळीच प्रचिती दिसली.

आमदार शेखर निकम यांनी मागील तीन वर्षात आरोग्य सेवा, पाणी प्रश्न, ग्रामपंचायत विकास, रोजगार, शेती विकास, पर्यटन विकास, ऐतिहासिक वारसा जपणूक, कला-क्रिडा, शैक्षणिक विकास, आपत्ती निवारण तसेच विविध योजनेंर्तगत अल्प कालावधीत सर्वांचा रेकॉर्ड ब्रेक करत साडे तीनशे कोटी पेक्षा जास्तीचा निधी मंजूर करुन आणला व नियोजनबद्ध खर्च करुन गावा-गावाचा विकास करत एक आदर्श नेतृत्वाचा ठसा उमटवला आहे. या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन सायले गावातील धनावडेवाडी, कानालवाडी, सुतारवाडी, बौद्धवाडी ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षात प्रवेश केला.

आमदार शेखर निकम म्हणाले ,सायले गाव आणि माझे ऋणानुबंध फार जुने आहेत. सायले गाव महाराष्ट्राला परिचीत असे गाव आहे. काही वर्षापूर्वी अजितदादा पवार यांच्या पत्नी सुनेत्राताई पवार यांचे सोबत सायले गावची आदर्श शाळा पहाण्यासाठी येथे आलो होतो. नावलौकीक संस्थेतील लोक या सायले गावात येऊन गेले व या सायले गाव शाळेचा आदर्श घेऊन त्याच्या पुढच्याच वर्षी स्पर्धेत काटेवाडी ला आदर्श शाळा पुरस्कार मिळवला. असे हे सायले आदर्शवत गाव आहे.

आपण माझ्यावर विश्वास दाखवून मला निवडून दिले व चिपळूण-संगमेश्वर मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानले. विजय (आण्णा) पांचाळ, अनंत धनावडे, सुभाष कानाल, दिपक कदम यांसारख्या अनुभवी शिलेदारांनी आपल्या निष्ठावंत सहका-यांसोबत राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला त्याबद्दल त्यांचे मनापासून स्वागत करतो. या तीन वर्षामध्ये महामारी, नैसर्गिक आपत्तीना तोंड देत जी निवडणूक काळात मतदार संघात अश्वासने दिली गेली ती ब-याचशा प्रमाणात पुर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या थोडक्याच्या काळात सवातीन कोटीचा निधी आणून नियोजित पद्धतीने मतदार संघाचा विकास करण्याचे धाडस केले आहे. हे सर्व आपल्या सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यामुळे शक्य झाले आहे. काही कामे झाली नसतील, दुर्लक्षीत राहिली असतील ती नेटाने पुर्ण करण्याचा प्रयत्न राहील. माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आपण ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलात त्याबद्दल तुमचे आभार व स्वागत केले.

पक्षांर्गत कामे करताना संघटीत होवून कामे करा व हेवे दावे विसरून पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने जास्तीज जास्त प्रयत्नशील रहावे यामध्ये लहान-मोठे, पदाधिकारी-कार्यकर्ते, जूने-नवीन कार्यकर्ते हा भेदभाव विसरुन सर्वानी एकमेकांना विश्वासात घेऊन पक्ष संघटना बळकट करा व राष्ट्र्वादी काँग्रेस पक्ष आप-आपल्या विभागात कसा वाढेल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत रहा. सरकार कुणाचेही असो विकास कामांच्या निधीची तुम्ही चिंता करु नका ती जबाबदारी माझी राहील असा शब्द आमदार निकम यांनी विश्वाने ग्रामस्थांना दिला आणि हे सर्व करत असताना आपल्या कुंटुंबाकडे दुर्लक्ष करु नका यामध्ये कुंटुंबाची आर्थिक, मुलांची शैक्षणिक या गोष्टीत सक्षम रहा असा “मोलाचा संदेश” दिला.

यावेळी विजय (अण्णा) पांचाळ, अनंत धनावडे, सुभाष कानाल, रविंद्र धनावडे, श्रीकांत कानाल, सुधिर पांचाळ, दत्ताराम पांचाळ, संदिप पांचाळ, प्रभाकर पांचाळ, सुधाकर पांचाळ, श्रीनिवास पांचाळ, नंदकुमार पांचाळ, दिपक कदम, अजित कदम, धर्मपाल कदम, अनंत जाधव, वैभव जाधव, संजय कदम, विशाल जाधव, शिवराज कदम, राकेश कदम आदीनी प्रवेश केला.

या प्रवेशावेळी संकेत खामकर, महेंद्र नादळजकर, अनंत घवाळी, सुर्यकांत पवार, गोविंद रांबाडे, सिताराम चांदे इ. विभागातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.