राजस्थान, मुघल आणि इंडो-वेस्टर्न थीमचा समावेश एकाच ठिकाणी
महाराष्ट्र, २ मार्च २०२३: लग्न म्हटलं की स्वप्नवत दुनियेची मागणी अलिकडे रूजली आहे. अशा डेस्टिनेशन वेडिंग करणा-यांसाठी आत्ता “मंगलम वेडिंग डेस्टिनेशन क्लब” सर्वोत्तम पर्याय आला आहे. एकाच छताखाली लग्नासाठी आवश्यक असलेल्या सर्व राजेशाही आणि मॉर्डन यांचा सुंदर मेळ घालणा-या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. देशातील सर्वात विस्तीर्ण आणि सामान्यांना परवडणारे डेस्टिनेशन आता औरंगाबाद मध्ये उपलब्ध होत आहे.
रिअल इस्टेट क्षेत्रात तब्बल तीन दशकांहून अधिक काळापासून कार्यरत असलेल्या गादिया ग्रुपने शेकडो गृहनिर्माण प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. त्यांनी आजवर हजारो लोकांना सदनिकांचा ताबा दिला आहे. गेल्या ३१ वर्षांच्या विश्वासार्हतेच्या बळावर आता गादिया ग्रुपने औरंगाबादमध्ये ‘वेडिंग डेस्टिनेशन क्लब’ म्हणजेच “मंगलम वेडिंग डेस्टिनेशन क्लब” विवाह सोहळ्यासाठी उपलब्ध करून दिला आहे.
“मंगलम वेडिंग डेस्टिनेशन क्लब” हा मौजेपुरी, धोरेगाव, गंगापूर तालुका, मराठवाडा येथील पहिला वेडिंग डेस्टिनेशन क्लब आहे. तब्बल २२ एकर क्षेत्रावर पसरलेला हा भव्य रॉयल प्रकल्प आहे. औरंगाबाद- नगर-पुणे महामार्गापासून फक्त ३ कि.मी अंतरावर आणि औरंगाबाद शहारापासून 28 कि.मी अंतरावर आहे. मंगलम वेडिंग डेस्टिनेशन क्लबमध्ये ३ वेडिंग लॉन असून त्यात राजस्थान थीम, मुघल थीम आणि इंडो-वेस्टर्न थीमचा समावेश आहे.
मंगलम वेडिंग डेस्टिनेशन क्लबमध्ये आलिशान १६० कॉटेज-रूम्स, ३ मोठे लॉन, ३ बँक्वेट हॉल, परिक्रमा-एम्फीथिएटर, कार्निव्हल, फोटोशूट गार्डन, क्लब हाऊस, स्विमिंग पूल, रेस्टॉरंट आणि मुलांसाठी खेळाचे उद्यान आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.