पुणे : साऊथ इंडियन बँकेने जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या भागीदारी सहकार्यातून संपत्ती व्यवस्थापन मंच सुरू करण्याची घोषणा केली आहे.
एसआयबी वेल्थ ही एक विशेष मूल्याधिष्ठित सेवा आहे जी बँकेच्या उच्च निव्वळ मत्ता (एचएनआय) ग्राहकांना त्यांचे पैसे बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम आर्थिक साधनांमध्ये गुंतवण्यास मदत करेल. या मंचाअंतर्गत, एसआयबी खालील उत्पादने/सेवा उपलब्ध करून देईल :
· रोखसंग्रह व्यवस्थापन सेवा
· पर्यायी गुंतवणूक निधी
· नियोजनबद्ध गुंतवणूक योजना
· म्युच्युअल फंड
· रोखे
· रिअल इस्टेट निधी
· रचनात्मक उत्पादने
साउथ इंडियन बँकेने विविध सेवा देण्यासाठी परिणामकारक आर्थिक उपायांपासून ते कामकाजात्मक सेवा देण्याचा ३५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड या गुंतवणूक सेवा कंपनीशी करार केला आहे.
साऊथ इंडियन बँकेचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि समूह व्यवसाय प्रमुख थॉमस जोसेफ यावेळी म्हणाले की, अलीकडच्या काळात व्यावसायिक संपत्ती व्यवस्थापन सेवांची मागणी वाढली आहे. आमच्या नऊ दशकांच्या वारशात, आमचे उद्दिष्ट नेहमीच आमच्या ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देणे हे राहिले आहे. ही सेवा एचएनआय ग्राहकांना योग्य आर्थिक उत्पादने आणि सल्लागारांसह मदत करेल जेणेकरून त्यांना त्यांच्या संपत्तीत वाढ करता येईल.मला विश्वास आहे की एसआयबी वेल्थ हे भारतातील सर्वात व्यापक संपत्ती व्यवस्थापन मंचापैकी एक ठरेल.”
जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडचे कार्यकारी संचालक जॉन्स जॉर्ज म्हणाले, ”नऊ दशकांहून अधिक काळाचा समृद्ध वारसा असलेल्या वित्तीय संस्थेशी भागीदारी केल्याचा आम्हाला अभिमान आहे. भारतीय भांडवली बाजारातील आमच्या ३५ वर्षांपेक्षा जास्त कौशल्य अनुभवाच्या आधारे गुंतवणुकीचे उपाय देण्यासाठी आम्हाला याचा फायदा होईल अशी आशा करतो. हे बँकेच्या खातेदारांना अनुकूल गुंतवणूक उपायांद्वारे त्यांची संपत्ती वाढवण्यास सक्षम करेल. एसआयबी वेल्थ ही एसआयबीच्या मजबूत ब्रँडमध्ये मोलाची भर घालेल अशी आम्हाला खात्री आहे.
एसआयबी वेल्थ एकात्मिक सेवा प्रदान करेल. त्यांच्या आर्थिक मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासोबतच आम्ही त्यांच्या वर्तमान आणि भविष्यातील गरजांसाठी धोरणात्मक योजना तयार करणार आहोत. जिओजितचे कौशल्य मौल्यवान असेल कारण आम्ही आमच्या उच्च निव्वळ मत्ता ग्राहकांना सर्वोत्तम संपत्ती व्यवस्थापन उपायांसह त्यांची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यास सक्षम करतो.