पुणे, २० नोव्हेंबर २०२२ : सध्या दूरदर्शनवर सोम ते शुक्र सुरु आहे. शहरातून एमबीए केलेली मुलगी आपल्या प्रियकरासोबत गावात येते आणि गावाचे परिवर्तन करते. त्याचबरोबर सरकारच्या योजना गावकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते.
गावातल्या वाईट आणि समाजाला त्रास देणाऱ्या सरपंचाला ती कशा प्रकारे धडा शिकवते याचे सार या मालिकेत दिले आहे. शिक्षण हे कायम उपयोगी पडणारे आहे आणि सतत शिकत राहिले पाहिजे. वाईटाचा नाश करण्यासाठी स्त्रीने पाऊल उचलले पाहिजे, हे या मालिकेतून दाखवले आहे.
रती पांडे हिने आपल्या सक्षम अभिनयाने सपरंचाच्या भूमिकेला न्याय दिला आहे. दूरदर्शन वाहिनीवर ही मालिका रात्री साडे आठ वाजता प्रदर्शित होत आहे.
साईबाबा स्टुडिओ आतापर्यंत अंताक्षरी, सारेगामा, व्हॅाईस ॲाफ इंडिया आणि म्युझिक का महामुकाबला असे अनेक रिएलिटी शोज आजपर्यंत केले आहेत. आता साईबाबा स्टुडिओमार्फत गजेंद्रसिंग यांनी मालिकांमधे पदार्पण केले आहे.
तेव्हा नक्की पहा कॅार्पोरेट सरपंच …दूरदर्शनवर सोम ते शुक्र … रात्री ८.३० वा .