सांगवी एफसी ब, पुणे वॉरियर्सचा संघर्षपूर्ण विजय – अशोका इलेव्हन, दुर्गा एसए संघही उपांत्यपूर्व फेरीत

57
Sangvi F.C 'B', Pune Warriors struggle; Ashoka XI, Durga SA cruise into last-8

पुणे : सांगवी एफसी ब, पुणे वॉरियर्स संघांनी संघर्षपूर्ण लढतीत विजय मिळवून द्वितीय-तृतीय श्रेणीतील अॅस्पायर चषक २०२३ स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

दुसरीकडे अशोका इलेव्हन, दुर्गा एसए संघांनी सहज विजय मिळवून आपली आगेकूच कायम राखली. पिंपरी येथील डॉ. हेडगेवार मैदानावर हे सामने होत आहेत. 

Sangvi F.C 'B', Pune Warriors struggle; Ashoka XI, Durga SA cruise into last-8

सांगवी एफसीला डायनामाईट्सविरुद्ध पूर्ण ताकदीने उतरता आले नाही. सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला अमित राक्षेने गोल नोंदवून सांगवी संघाचे खाते उघडले. मात्र, त्यानंतर अनेक प्रयत्न करूनही सांगवीच्या खेळाडूंना गोलाधिक्य वाढवण्यात अपयश आले. 

Sangvi F.C 'B', Pune Warriors struggle; Ashoka XI, Durga SA cruise into last-8

त्यानंतर झालेल्या साम्नयात पुणे वॉरियर्सने नियोजित वेळीतेल गोलशून्य बरोबरीनंतर इन्फंटस एफसी सँघाचा शूट-आऊटमध्ये ५-४ असा पराभव केला. नियोजित वेळेतील कंटाळवाण्या खेळानंतर शूट आऊटमध्ये अनिकेत गुप्ता, प्रशांत कावडे, प्रसाद नाईक, संदेश सरवडे आणि विकास गुप्ता यांनी जाळीचा अचूक वेध घेतला. पराभूत इन्फंटस संघाकडून केवळ यश लोणारे, संकेत घोरे, सयद तल्हा आणि स्टिफन काटेला गोल साधण्यात यश आले. 

Sangvi F.C 'B', Pune Warriors struggle; Ashoka XI, Durga SA cruise into last-8

अशोका इलेव्हनने अगदी सहरजपणे नवमहाराष्ट्राचे आव्हान ३-० असे परतवून लावले. रवी किरणने आठव्या मिनिटाला गोल केल्या, प्रसाद भंडारीने २०व्या मिनिटाला गोल करून आघाडी वाढवली. उत्तरार्धात श्रीरागने ३६व्या मिनिटाला गोल करून ही आघाडी भक्कम केली आणि याच आघाडीवर ३-० असा विजय मिळविला. 

दुर्गा एस.ए. संघाने नियंत्रित खेळ करून आर्यन्स एस.सी. ब संघाचा ३-० अशाच फरकाने पराभव केला. पूर्वार्धात करण दुर्गाने १४व्या मिनिटाला गोल केल्यावर अन्य दोन गोलसाठी त्यांना उत्तरार्धाची वाट पहावी लागली. उत्तरार्धात नीरज मानेने ३६, तरप रॉनी रोझारियोने ४६व्या मिनिटाला गोल केला. 

निकाल –

सांगवी एफसी ब १ (अमित राक्षे ३रे मिनिट) वि.वि. डायनामाईटस एस.सी. ०

अशोका इलेव्हन ३ (रवी किरण ८वे मिनिट, प्रसाद भंडारी २०वे मिनिट, श्रीराग व्ही. आर. ३६वे मिनिट) वि.वि. नव महाराष्ट्र ०

दुर्गी एस.ए. ३ (करण दुर्गा १४वे मिनिट, नीरज माने ३६वे मिनिट, रॉनी रोझारियो ४६वे मिनिट) वि.वि. आर्यन्स एस.सली. ०

पुणेरी वॉरियर्स ० (५) (अनिकेत गुप्ता, प्रशांत कावडे, प्रसाद नाईक, संदेश सरवदे, विकास गुप्ता) वि.वि. इन्फंटस एफसी ०(४) (यश लोणारे, संकेत घोरे, सयद तल्हा, स्टिफन काटे)