सहायक फौजदाराची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

170

जालना पोलिस मुख्यालयातील प्रकार; कारण अस्पष्ट

जालना : सहाय्यक फौजदाराने पोलिस मुख्यालयातच डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जालन्यात घडली आहे. मंगळवारी सकाळी ९च्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, ही माहिती मिळताच पोलिस अधीक्षक एस. चैतन्य यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेले सहायक फौजदार सुभाष गायकवाड हे रात्री ड्युटी करून  मंगळवारी सकाळी 8.45 वा. स्कॉटिंग करून पिस्तूल जमा करण्यासाठी मुख्यालयाच्या शस्त्रागार विभागात गेले होते. त्यादरम्यान, शस्त्रागार विभागाच्या पाठीमागे जाऊन त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.