मुंबई, २८ जून २०२३ – मेडिक्स ग्लोबल या जागतिक आरोग्यसेवा क्षेत्रातील कंपनीने डिजिटल हेल्थ इनोव्हेशन चॅलेंज २०२३ जाहीर केले आहे. स्टार्ट- अप्स आणि इनोव्हेटर्ससाठी असलेल्या या स्पर्धेत त्यांना अत्याधुनिक डिजिटल आरोग्य सुविधा तयार करण्याचे आव्हान देण्यात येणार आहे. या स्पर्धेत स्त्रियांचे आरोग्य तसेच मानसिक आरोग्याशी संबंधित आरोग्यसेवा क्षेत्रात काम करणाऱ्या टेक स्टार्ट- अप्सवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या स्टार्ट अप्स, या क्षेत्रातील उणीवा भरून काढत आरोग्यसेवा तातडीने उपलब्ध करून देत आहेत. आरोग्यसेवांचा दर्जा सुधारण्यावर, त्यात दिसून येणारा भेदभाव कमी करण्यावर त्यांचा भर आहे. देशात दीर्घकालीन टिकू शकणारी आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी या स्टार्ट- अप्स प्रयत्नशील आहेत. दोन महिने चालणार असलेली ही स्पर्धा ऑगस्ट २०२३ मध्ये संपणार असून त्यासाठीच्या प्रवेशिका २८ जून पासून पाठवता येणार आहेत. मेडिक्स ग्लोबलने व्हिजनरी स्टार्ट- अप्स, तळमळीने आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संशोधक, भविष्यवेधी संस्थांना या यात सहभागी होऊन आपले अनोखे डिजिटल आरोग्य सेवा उत्पादन सादर करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे भारतातील स्त्रियांच्या आरोग्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गरजा पुरवणे सहज शक्य होईल.
● मेडिक्स ग्लोबलचा उपक्रम – स्त्रियांचे आरोग्य तसेच मानसिक आरोग्य व्यवस्थापनासाठी उच्च तंत्रज्ञानयुक्त सुविधा पुरवण्यातील दरी भरून काढणार
● देशभरातील इनोव्हेटर्स आणि स्टार्ट- अप्सना आमंत्रण
● यासाठीच्या प्रवेशिका २८ जूनपासून पाठवता येणार
भारतीय अर्थव्यवस्थेचा लक्षणीय विकास होत आहे, मात्र त्यातील स्त्री कर्मचाऱ्यांचा सहभाग घसरत आहे. २०२१-२२ मध्ये नोकरदार वयोगटातील केवळ २९.४ टक्के स्त्रिया भारतीय कर्मचारी वर्गात कार्यरत होत्या. २००० च्या तुलनेत ही आकडेवारी बरीच कमी आहे. आर्थिक विकास टिकवून ठेवण्यासाठी व त्याला चालना देण्यासाठी स्त्री कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. त्यावरून स्त्रियांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी चांगल्या सुविधा उपलब्ध असण्याचे महत्त्व लक्षात येईल. अशा सुविधांच्या मदतीने स्त्रिया वेगवेगळे अडथळे पार करून जास्त चांगल्या प्रकारे अर्थव्यवस्थेसाठी योगदान देऊ शकतील.
राष्ट्रीय पातळीवरील आकडेवारीनुसार गेल्या २ वर्षांत देशातील २ लाख स्त्रियांना गर्भाशयाचा कर्करोग आणि स्तनांच्या कर्करोगामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. स्तनांच्या कर्करोगाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास २०२० मध्ये भारतात ३७.२ टक्के स्त्रियांचा मृत्यू झाला. या आजाराचा आशिया खंडातील मृत्यूदर भारताच्या तुलनेत कमी म्हणजे ३४ टक्के आहे. जागतिक पातळीवर हा दर त्याहीपेक्षा कमी म्हणजे ३० टक्के आहे. मानसिक आरोग्य हा खूप महत्त्वाचा घटक आहे आणि त्याचा उत्पादनक्षमता तसेच आर्थिक विकासावर थेट परिणाम होतो. भारतीय एम्प्लॉयर्सना दरवर्षी १४ अब्ज डॉलर्स इतकी रक्कम केवळ मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांवर खर्च करावी लागते. यावरून मानसिक आरोग्यासाठी पूरक सुविधा तयार करणे, त्या सहजपणे उपलब्ध करून देणे हे कर्मचारी तसेच एम्प्लॉयर्स या दोघांसाठी आवश्यक झाले आहे.
डिजिटल हेल्थ इनोव्हेशन चॅलेंज २०२३ विषयी मेडिक्स समूहाच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी सौ. सिगल अत्झमॉन म्हणाल्या, ‘राष्ट्रीय पातळीवरील आकडेवारी आणि कमी झालेली स्त्री कर्मचाऱ्यांची संख्या भारतातील स्त्रिया व मानसिक आरोग्याची परिस्थिती धोकादायक पातळीला पोहोचत असल्याचा इशारा देणारी आहे. यासंदर्भात तातडीने हालचाल करणे गरजेचे आहे. भारत सरकार या क्षेत्रात लक्षणीय काम करत असले, तरी