अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. फोटो व व्हिडीओच्या माध्यमातून ती सतत आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. अलिकडेच तिने एक चित्र आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले होते. या चित्रामुळे सनीवर चोरीचा आरोप केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी सनीने एक चित्र इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. हे चित्र तिने स्वत: काढल्याचा दावा केला होता. तसेच या चित्राला विकल्यानंतर मिळणारे पैसे ती कर्करोग ग्रस्त रुग्णांना उपचारासाठी देणार होती. मात्र हे चित्र मलिका फावरे नावाच्या चित्रकाराचे असून तिने या चित्राची नक्कल केल्याचा आरोप डाएट सब्या या इंस्टाग्राम अकाऊंटवरून करण्यात आला आहे.