सनातन संस्थेचा मंदिर स्वच्छता उपक्रम

54
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त पुणे येथे मंदिराची स्वच्छता !
    पुणे – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवानिमित्त संपूर्ण देशात ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबवण्यात येते. या अंतर्गत हिंदू समाजात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी आणि रामराज्यासम आदर्श राष्ट्राच्या उभारणीविषयी जागृती करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिरांचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊन सनातन संस्थेच्या वतीने जन्मोत्सवाचे अवचित्य साधून पुणे जिल्ह्यातील एकूण ३५ पेक्षा अधिक मंदिराची स्वच्छता करून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रार्थना करण्यात आली. तसेच ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ अंतर्गत अजूनही मंदिर स्वच्छता मोहीम चालू आहे.
     हिंदू धर्मात ‘मंदिरे’ हीच धर्माचे प्राण आहेत. या प्राणाला अर्थात मंदिरांना जपणे आणि त्यांचे संवर्धन करणे ही प्रत्येकच हिंदूचे प्रथम कर्तव्य आहे. मंदिरे ही सात्त्विकतेची स्रोतच आहेत. या वेळी समाजातील हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी आदींसह जिज्ञासू, तसेच मंदिरातील भाविक उपस्थित होते. मंदिराचा परिसर आणि इतर परिसराची स्वच्छता करण्यात आली.