सतीश गुप्ता डॉक्टरेट पुरस्काराने सन्मानित 

57

पुणे : पुण्यातील उद्योजक सतीश पुरणचंद गुप्ता यांना बंगळुरू येथे व्यवसाय व्यवस्थापन विषयात मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे.

भारत व्हर्च्युअल युनिव्हर्सिटी फॉर पीस अँड एज्युकेशनच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डॉ.  कुमार राजेश आणि उपकुलगुरू टी.एम.  स्वामी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.  सतीश गुप्ता हे मार्केटयार्ड येथे गेल्या 47 वर्षापासून पुरणचंद अँड सन्स नावाने व्यवसाय करित आहेत. गुप्ता यांना व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी आणि आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण करणे आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असणे याबद्दल डॉक्टरेट  पदवी प्रदान करण्यात आली आहे.

श्री.गुप्ता यांनी या डॉक्टरेटचे संपूर्ण श्रेय स्व. आई कृष्णादेवी व वडील पुरणचंद अग्रवाल आणि कुटुंबीयांना दिले आहे.  श्री.गुप्ता पुढे म्हणाले की, माझ्या आई-वडिलांनी दिलेल्या कठोर परिश्रम आणि समर्पणाच्या मंत्राचे पालन करून आज मी यशाच्या शिखरावर पोहोचलो आहे. 

मला आजच्या तरुण पिढीला एक संदेश द्यायचा आहे की त्यांनी शॉर्टकटवर विश्वास न ठेवता  मेहनत आणि समर्पणाने यश मिळवावे.  काही महिन्यांपूर्वी श्री. गुप्ता यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते मास्टर्स ऑफ बिझनेस पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.