सणासुदीच्या काळामुळे फिक अप वाहने घेणाऱ्या ग्राहकांसाठी  महिंद्राची आकर्षक वित्तीय योजना

28
mahindra-rise

मुंबईसप्टेंबर २०२३ – बोलेरो पिक अप हा भारतातील नंबर १ पिक ब्रँड तया करणाऱ्या महिंद्राने या सणासुदीच्या काळासाठी आकर्षक वित्तपुरवठा योजना सुरू करत असल्याची घोषणा केली आहे. अनेक प्रकारच्या ग्राहकांना महिंद्रा पिक अप कुठल्याही अडथळे, अडचणींशिवाय खरेदी करता येवे यासाठी योग्य रित्या वित्तीय पुरवठा योजना तयार करण्यात आल्या आहेत.

  • सात वर्षांपर्यंत मुदत असलेले कर्ज – परवडावा म्हणून कमी हप्ता
  • उद्योग क्षेत्रातील सर्वात कमी व्याज दर – ११.५ टक्क्यांपासून व्याजदर सुरू
  • परवडणाऱ्या हप्त्यांचा पर्याय – १२,९९९ रुपये एवढ्या कमी  हप्त्यापासून महिंद्रा सिटी पिक अपसाठी हप्ता तर महिंद्रा एचडी पिकअपसाठी  १५,५५५ रुपये
  • ऑन रोड वित्तपुरवढा – १०० टक्क्यांपर्यंत वित्त पुरवठा उपलब्ध
  • कृषी ग्राहकांसाठी त्रैमासिक/संरचित/कर्ज परतफेड पुढे ढकल्याच्या हप्त्यांचे पर्यायही उपलब्ध – त्यामुळे पैशांचे व्यवस्थापन करणेही सोपे जाते

ग्राहकांना परवडावे आणि त्यांना मासिक हप्ताही कमी बसावा यासाठी महिंद्राने पिक अप खरेदी करणाऱ्यांसाठी सात वर्षांची वित्त पुरवठा योजनेचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. योजनेच्या कालावधीमुळे ग्राहकांना कमी रकमेच्या हप्त्यांचा फायदा होईल आणि त्यांना वाहनाची मालकी घेणेही सोपे आणि सुलभ होईल.

महिंद्राने आपल्या वित्तीय भागीदारांच्या सहाय्याने ११.५ टक्के व्याजदरापासून सुरू होणाऱ्या वित्त पुरवठा योजना आणल्या असून कमी व्याजदरामुळे लोकांना व्याजही कमी लागेल. ग्राहकांना आता १२,९९९ एवढ्या कमी मासिक हप्त्यावर मॅक्स पिक अप सिटी हे वाहन खरेदी करता येईल तर मॅक्स पिक अप एचडीसाठी केवळ १५,५५५ रुपयांपासून मासिक हप्ता सुरू होईल. त्यामुळे पिकअप वाहन खरेदी करण्याऱ्यांवर जास्त ताण येणार नाही आणि त्यांचे मासिक बजेटही बिघडणार नाही.

महिंद्राने १०० टक्के वित्तपुरवठा* करण्याची योजनाही आणली आहे. त्यात विमा आणि रोड टॅक्स यांचाही समावेश आहे. त्यामुळे ग्राहकांना वाहन खरेदी करण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. आमच्या कृषी ग्राहकांसाठी आम्ही सुरुवातीच्या दोन महिन्यांसाठी कर्ज परतफेड पुढे ढकल्याच्या हप्त्यांचे पर्यायही उपलब्ध करून दिला आहे किंवा त्यांना सुरुवातीच्या महिन्यांमध्ये दोन कमी रकमेच्या हप्त्यांचाही पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तिसऱ्या महिन्यापासून नियमीत हप्त्ता सुरू होईल. ऋतुमानाप्रमाणे बदणारे कृषी उत्पन्न लक्षात घेत ही वित्तपुरवठा योजना तयार करण्यात आली असून त्यामुळे शेतकरी आणि शेतीसंदर्भात काम करणाऱ्या कामगारांना फायदा होणार आहे.

पहिल्यांदाच कर्ज घेणारे, मार्केट लोड ऑपरेटर्स, ठराविक ग्राहक, फ्लीट ग्राहक अशा विविध प्रकारच्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या वित्त योजना महिंद्राने तयार केल्या आहेत. त्यात ८४ महिन्यांपर्यंत कर्जाचा कालवधी मिळतो तर १०० टक्क्यांपर्यंत ऑन रोड फंडिगही उपलब्ध असते.

या आकर्षक वित्तपुरवठा योजना मर्यादित काळासाठीच उपलब्ध असून, भारतातील महिंद्राच्या सर्व अधिकृत डीलर्सकडे उपलब्ध आहेत. ग्राहकांना त्याचा लाभ तेथे घेता येईल.  ग्राहकांनी आपल्या जवळच्या डीलरशीपडे जाऊन भेट द्यावे. वित्तीय योजनांची माहिती घेऊन महिंद्र पिक अपचा मालक होण्याचे आपले स्वप्न पूर्ण करावे.