सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांची नवी मालिका ‘पोस्ट ऑफिस उघड आहे’

132

पुणे, ३ जानेवारी, २०२३ : सोनी मराठी वाहिनी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करते. आता अजून एक वेगळी मालिका आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांनी पाहिली आहे. ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे…’, असं या मालिकेचं नाव आहे आणि ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी लवकरच दाखल होणार आहे. वेगळ्या विषयांच्या आणि धाटणीच्या मालिका आपल्याला सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळतात.

‘पोस्ट ऑफीस उघडं आहे…’ या मालिकेबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रेक्षकांचे आवडते हास्यवीर या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. नेहमी निरनिराळ्या स्किट्समधून आपल्याला हसायला भाग पडणारे हास्यवीर आता या विनोदी मालिकेतून आपल्या भेटीला येताहेत. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिरेखांबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

प्रेक्षकांचे लाडके ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे हेसुद्धा ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे…’ या मालिकेतून मालिकेत छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहेत. सोबतच हास्यवीर समीर चौघुले, प्रभाकर मोरे, अरुण कदम, पृथ्वीक प्रताप, ईशा डे, वनिता खरात, ओम्कार राऊत, शिवाली परब, संदेश उपश्याम, दत्तू मोरे, रसिका वेंगुर्लेकर, निखिल बने हे कलाकारही या मालिकेतून आपल्या भेटीला येणार आहेत. ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे…’ ही मालिका  भूतकाळातील गोड आठवणींना उजाळा देणारी मालिका आहे. पारगाव नावाच्या एका गावात  पोस्ट ऑफीस आहे. या पोस्टात काम करणारी मंडळी, त्यांचा रोजचा दिवस, त्यात तिथे घडणाऱ्या घटना यांभोवती ही मालिका आणि तिची गोष्ट फिरते. त्याशिवाय या मंडळींच्या घरची गोष्टही आपल्याला पाहायला मिळेल.

सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या जोडीनी आजपर्यंत प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून आजवर त्यांनी प्रेक्षकांना हसायला भाग पडलं आहे. आता ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे…’ या त्यांच्या पहिल्या मालिकेद्वारे ते हास्याचा धमाका घेऊन येताहेत. त्याचबरोबर प्रेक्षकांना जुन्या आठवणींमध्ये घेऊन जाणार आहेत.   त्याबरोबरच प्रेक्षकांचे लाडके विनोदवीर या मालिकेतून पाहायला मिळणार आहेत. समीर चौघुले, पृथ्वीक प्रताप, प्रभाकर मोरे, ईशा डे, दत्तू मोरे असे कलाकार या मालिकेत आहेत. प्रेक्षकांसाठी ही पर्वणी असणार आहे. आपल्या लाडक्या कलाकारांना नवीन भूमिकांत पाहायला मिळणार आहे. ‘पोस्ट ऑफिस उघडं आहे…’ ही विनोदी मालिका प्रेक्षकांना नक्कीच भुरळ पाडेल यात शंका नाही. अवघ्या महाराष्ट्राला ही हास्याची मनी ॲार्डर नक्की आवडेल यात शंका नाही.

पाहायला विसरू नका, नवी मालिका – ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे…’, ५ जानेवारीपासून गुरुवार ते शनीवार रात्री 9 वा. सोनी मराठी वाहिनीवर.