संविधान दिनी ‘रिपाइं’तर्फे बाईक रॅली व व्याख्यान

72

पुणे, २६ नोव्हेंबर २०२२ : संविधान दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) – रिपाइं, सम्यक ट्रस्ट आणि संविधान सन्मान समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बाईक रॅली व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार, दि. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या रॅलीची सुरवात होईल. पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी रॅलीची सांगता होणार आहे. 

दुपारी १२.३० वाजता ‘रिपाइं’चे राष्ट्रीय सरचिटणीस, माजी समाजकल्याण राज्यमंत्री व साहित्यिक अविनाश महातेकर यांचे ‘संविधानाने दिलेले अधिकार व आमची कर्तव्ये’ या विषयावर व्याख्यान होईल, अशी माहिती ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव व शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण यांनी दिली.

याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष असित गांगुर्डे, शहर सरचिटणीस महिपाल वाघमारे, संपर्क प्रमुख अशोक कांबळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऍड. मंदार जोशी, पश्चिम महाराष्ट्र सचिव मोहन जगताप आदी उपस्थित होते.