संपूर्ण भारतातील २०० दशलक्ष लॉक स्क्रीन्स वरुन टाटा आयपीएल चे प्रसारण करण्यासाठी ग्लान्स आणि जिओ सिनेमा ने केली भागीदारी 

60

पुणे :  क्रिकेट फॅन्स ना प्रत्येक गेम थेट त्यांच्या लॉक स्क्रीन वर पाहून बॉल बाय बॉल थेट प्रसारण जिओ सिनेमा ॲपवर पाहता येणे शक्य  ग्लान्स या जगभरांतील आघाडीच्या स्मार्ट लॉक स्क्रीन प्लॅटफॉर्म ने आज जिओ ‍सिनेमा बरोबर भागीदारी करुन टाटा आयपीएल चे एक्सक्लुझिव्ह डिजिटल डेस्टिनेशन बनून प्रेक्षकांना अनोखा अनुभव देऊ करत असल्याची घोषणा केली. या भागीदारी मुळे आता २०० दशलक्षांहून अधिक ग्लान्सच्या ग्राहकांना ‘लॉक स्क्रीन टू ॲप’ च्या माध्यमातून देशात प्रथमच अनुभव घेण्याची संधी प्राप्त झाली आहे.

ग्लान्स आणि जिओ सिनेमा यांच्यातील या भागीदारीमुळे क्रिकेटच्या चाहत्यांना आता पर्सनलाईज्ड आणि प्रिमियम अनुभव प्राप्त होणार असून आता त्यांना २०२३ च्या टाटा आयपीएल मौसमात फिल्डवर आणि ऑफ फिल्ड जोडले राहणे शक्य होणार आहे. त्यांना आता सुंदर आणि आकर्षक कंटेंट त्यांच्या लॉक स्क्रीन्स वर जिओ सिनेमा ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. त्यांच्या फेव्हरेट कंटेंट वर टॅप करुन फॅन्स ना जिओ सिनेमावरील थेट प्रसारण पाहता येणार आहे. जर त्यांनी स्मार्टफोन वर जिओ सिनेमा ॲप डाऊनलोड केले असेल तर हे दिसू शकेल किंवा जर जिओ सिनेमा ॲप डाऊनलोड केले नसेल तर ते डाऊनलोड करावे लागेल व त्यानंतर ते लीगचा अनुभव घेऊ शकतील. ग्लान्स द्वारे पावर्ड असलेला हा अनुभव आता भारतातील सर्व आघाडीच्या ॲन्ड्रॉईड स्मार्टफोन्सवरुन घेणे शक्य होईल.

जिओ सिनेमाच्या टाटा आयपीएल च्या कव्हरेज चे ग्लान्स सह एकत्रिकरण केल्यामुळे आता क्रिकेटच्या चाहत्यांना अनोखा अनुभव तर मिळेलच पण त्याच बरोबर त्यांना लगेच क्रिकेटच्या ॲक्शनसह अपडेट्सही मिळतील. त्याच बरोबर ग्राहकांना ग्लान्सवर आधारीत त्यांच्या आवडीच्या टिम आणि खेळाडूं साठीचा टी२० कंटेंट जसे ताजा स्कोअर, मॅच अपडेट्स आणि हायलाईट्स त्यांच्या लॉकस्क्रीनवर थेट पाहू शकतील. आता ग्राहकांना एक्सपर्ट मॅच ॲनेलिसिस, टिम डिस्कशन्स, प्लेअर सिलेक्शन विषयीचे विचार, कार्यक्षमतेची मोजणी, क्रिकेट खेळाडूं बरोबरचे लाईव्ह चॅट सेशन्स आणि सिझनच्या मॅचेसमधील पार्टीज सुध्दा पाहता येतील.अनेक नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह देशभरातील क्रिकेटच्या चाहत्यांना आता ताज्या, रिअल टाईम आणि इन्साईट्सचा लाभ ग्लान्स लॉक स्क्रीन आणि ‍जिओ सिनेमा ॲप वरुन अपटूडेट राहता येणार आहे.

“ टाटा आयपीएलच्या फॅन्स साठी आमची ही भेट म्हणजे त्यांना थेट खेळांचा अनुभव प्राप्त करुन देणे आहे. ग्लान्स बरोबर ही भागीदारी करतांना आंम्हाला आनंद होत आहे, कारण या भागीदारीमुळे त्यांना सोपा आणि समृध्द अनुभव प्राप्त होऊन तो त्यांना थेट त्यांच्या लॉक स्क्रीनवर घेणे शक्य होईल.” असे व्हायकॉम १८ चे स्ट्रॅटेजी आणि पार्टनरशिप फॉर स्पोर्ट्स चे प्रमुख हर्श श्रीवास्तव यांनी सांगितले “ ग्लान्स आणि जिओ सिनेमा दोघेही ग्राहकांचा अनुभव डिजिटली समृध्द करत आहोत आणि यामुळे पुढे जाऊन क्रिकेट चा अनुभव कसा समृध्द होईल ते ठरेल.”

ग्लान्स चे चीफ मार्केटिंग ऑफिसर बिकाश चौधरी यांनी सांगितले “ ग्लान्सचे डिझाईन हे ग्राहकांना सर्वोत्कृष्ट इंटरनेट वरील कंटेंट थेट त्यांच्या लॉकस्क्रीनवर देण्यासाठी करण्यात आले आहे. जिओ सिनेमा बरोबरची ही भागीदारी म्हणजे दोन्ही जगतांना म्हणजेच लॉक स्क्रीन आणि ॲप यांना एकत्र आणून क्रिकेट फॅन्सना अनोखा अनुभव देऊ करत आहे. आता त्यांना अपडेट्स आणि टी २० क्रिकेट चे प्रमुख अंश हे त्यांच्या लॉक स्क्रीनवर उपलब्ध होईल आणि त्याच बरोबर गेमचे थेट प्रसारण जिओ सिनेमा ॲपवरुन पाहता येईल, तसेच ते कुठेही असले तरीही गेमशी जोडलेले राहू शकतील.”

ग्लान्स हा क्रांतिकारी कंटेंट अनुभव प्रदाता असून त्यांच्या कडून ॲन्ड्रॉईड स्मार्टफोन्स च्या लॉक स्क्रीनवरून घेता येतो. ग्लान्स ने प्रथमच ‘स्मार्ट लॉक स्क्रीन’ मंच तयार केला असून हा मंच आर्टिफिशियल इंटेलिजन्सने युक्त असल्या कारणाने वापरकर्त्यांना त्यांच्या आवडीचा कंटेंट म्हणजेच संगीत, मनोरंजन, खेळ, गेमिंग, ट्रेन्ड्स आणि अन्य कंटेंट सहज उपलब्ध होतो.

२०२२ मध्ये स्पोर्ट्स ग्लान्स लॉक स्क्रीनवर पाहिल्या जाणार्‍या सर्वात लोकप्रिय सामग्री श्रेणींपैकी एक म्हणून उदयास आले, या मंचाने १४५ दशलक्ष इंप्रेशन प्राप्त केले. ग्लान्स कडून खेळांशी संबंधित कंटेंट उपलब्ध करुन देण्यात येत असून यांत टाटा आयपीएल, फिफा वर्ल्ड कप कतार २०२२ आणि अन्य खेळांच्या उपक्रमांचा समावेश असून यामुळे खेळांच्या चाहत्यांना अनोखा अनुभव प्राप्त झाला आहे.