पुणे, २४ डिसेंबर २०२२ : ५० हून अधिक वैशिष्ट्ये आणि कार्यक्षमतांमधील सुधारणांसह, मूव्हओएस३ कडून ओलाच्या एस१ परिवारातील स्कूटरच्या संपूर्ण क्षमतेचा वापर करणे शक्य मूव्हओएस३ या सर्वात मोठ्या ओटीए अपडेट मुळे कोणत्याही दुचाकी ओईएम कडून सर्वाधिक म्हणजेच १ लाखांहून अधिक ग्राहकांना लाभ ओला इलेक्ट्रिक या भारतातील सर्वांत मोठ्या इव्ही उत्पादक कंपनी ने आज त्यांच्या मूव्हओएस३ या सर्वांत मोठ्या अत्याधुनिक सॉफ्टवेअर अपडेटच्या सार्वजनिक वितरणाची सुरुवात केल्याची घोषणा केली. देशपातळीवरील या नवीन अपडेट मुळे आता संपूर्ण भारतातील १ लाखांहून अधिक ओला ग्राहकांना ओव्हर द एअर (ओटीए) अपडेट्स प्राप्त होणार आहेत. यामुळे आता देशातील तंत्रज्ञानाने सर्वात आधुनिक आणि वैशिष्ट्यांनी युक्त अशा दुचाकीचा संपूर्ण क्षमतेने वापर करणे ग्राहकांना शक्य होणार आहे.
मूव्हओएस ३ हे ओलाचे या वर्षातील तिसरे मोठे सॉफ्टवेअर अपडेट असून हे आता नवीन आणि सध्याच्या ओलाच्या एस१ परिवारातील स्कूटर्स साठी उपलब्ध असेल. बहुप्रतिक्षित अशा या सॉफ्टवेअर अपडेट मुळे स्कूटरची कार्यक्षमता तर वाढेलच पण त्याच बरोबर सुधारीत ॲक्सेस सह अनोखा बेजोड राईड अनुभव आणि सोपेपणा वापरकर्त्यांना मिळून कंपनीच्या वेगाने वाढणार्या व सध्या भारतातील २७ राज्यात असलेल्या हायपरचार्ज नेटवर्कशीही जोडणी होऊ शकेल. वापरकर्त्यांना आता ओला हायपरचार्जर्सच्या माध्यमातून ५० किमी ची अधिकची रेंज ही १५ मिनीटांच्या फास्ट चार्जिंग मुळे प्राप्त होणार आहे.
ओला इलेक्ट्रिक चे संस्थापक आणि सीईओ भावीश अग्गरवाल यांनी सांगितले “ वचन दिल्या प्रमाणे आम्ही मूव्हओएस३ ची सुरुवात या आठवड्यात आमच्या सर्व ओला एस१ मालकांसाठी करत आहोत. वर्षभराच्या कालावधीत हे तिसरे मोठे सॉफ्टवेअर अपडेट आहे. मला माझ्या इंजिनियर्सचा अभिमान वाटतो कारण त्यांच्यामुळे हे जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान अशा वेगाने उपलब्ध झाले. ओला मध्ये आम्ही नेहमीच सर्वोत्कृष्ट उत्पादने तयार करत असतो आणि त्यानंतर ते अधिक चांगले करण्यावर भर देत असतो. मूव्हओएस२ हे काळाच्या खूपच पुढे होते, यामध्ये दुचाकीत प्रथमच अनोखी वैशिष्ट्ये देण्यात आली होती. मूव्हओएस३ मुळे भारतातील आवडीची स्कूटर अधिक चांगली आणि खरोखरच सर्वसमावेशम मशीन बनून ईव्ही दुचाकींच्या प्रगतीचा वेग हा देशात आणि जगभरात वाढू शकेल.”
मूव्हओएस३ अपग्रेड मुळे आता ओला एस१ प्रो आणि ओला एस१ ला मध्ये ५० हून अधिक वैशिष्ट्ये आणि सुधारणा प्राप्त होतील, या सुधारणा परफॉर्मन्स, ॲक्सेस आणि कन्व्हिनियन्स या तीन स्तंभांवर आधारीत आहेत-
परफॉर्मन्स-
- हायपरचार्जिंग- ओला स्कूटर्स आता ओला हायपरचार्जर्स या वेगाने वाढणार्या नेटवर्कशी कॉम्पॅटिबल असतील. म्हणजेच हायपरचार्जर्स मुळे १५ मिनीटांमध्ये ५० किमीची अधिक रेंज प्राप्त होईल.
- ॲडव्हान्स्ड रिगेन – मूव्हओएस३ मुळे आता ३ विविध रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टम्स प्राप्त होणार असून त्यामुळे वापरकर्ते त्यांच्या चालवण्याच्या पध्दतीप्रमाणे निवड करु शकतील. रिजनरेटिव्ह ब्रेकिंग मुळे रेंज मध्ये ही सुधारणा होऊ शकते.
- व्हेकेशन मोड – जर तुम्ही कामानिमित्त किंवा परिवारासह सूट्टीवर जात असाल तर वापरकर्ते आता त्यांची स्कूटर या मोड वर ठेऊन जाऊ शकतात आणि डिस्चार्ज होण्याच्या भितीपासून २०० दिवसांपर्यंत सुटका करु शकतात.
- हिल होल्ड*- हिलहोल्ड मुळे वापरकर्त्यांना चढणावर सहयोग मिळतो. हिल होल्ड ॲक्टिव्हेट केल्यामुळे मोटरचा टॉर्क वाढून गाडी चढणावरून खाली घरंगळून येण्यास प्रतिबंध मिळतो.
ॲक्सेस-
- प्रोफाईल्स- विविध प्रकारच्या प्रोफाईल पर्यायांमुळे आता वापरकर्ते त्यांचे सेटिंग्ज हे ओलाच्या इकोसिस्टम नुसार तयार करुन एक अजोड अनुभव प्राप्त करु शकतील.
- प्रॉक्झिमिटी लॉक/अनलॉक- बाजारपेठेत प्रथमच असे वैशिष्ट्य असून यामुळे ते त्यांची स्कूटर ही त्यांच्या फोनवरुन स्कूटरच्या जवळ जाऊन लॉक/अनलॉक करु शकतील.
- वायफाय- वापरकर्त्यांना आता वायफाय कनेक्टिव्हिटी मुळे त्यांची स्कूटर अजोडपणे वापरता येईल.
कन्व्हिनियन्स-
- मूड्स – वापरकर्ते आता त्यांचा गाडी चालण्याचा अनुभव अगदी बेजोड करु शकतात याकरता ते डॅश आणि स्कूटरचा आवाजही आवडीचा ठेऊ शकतील. प्रत्येक ३ मूड्स ‘बोल्ट’, ‘व्हिंटेज’ आणि ‘एक्लिप्स’ मध्ये आता लाईट आणि डार्क मोड्स उपलब्ध आहेत.
- पार्टी मोड- आता वापरकर्त्यांना ते जिथे जातील तिथे पार्टी करणे शक्य आहे, यामध्ये स्कूटर लाईट शो सिंक्रोनाईज्ड असून त्यामुळे चालू असलेल्या गाण्यानुसार ते स्कूटर चे लाईट्स लागतात.
- ब्लुटूथ कॉलिंग- वापरकर्त्यांना आता कॉल आल्याचे नोटिफिकेशन हे डॅशवर प्राप्त होऊन ते सदा सर्वदा आपल्या परिजन आणि मित्रांबरोबर जोडलेले राहू शकतील.
- डॉक्युमेंट्स ऑन स्कूटर – या अंतर्गत आता वापरकर्त्यांना त्यांची ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड इत्यादींसारखी महत्त्वपूर्ण कागदपत्रे ओला इलेक्ट्रिक ॲपवर साठवता येतील आणि त्याचा ॲक्सेस स्कूटरच्या एचएमआय स्क्रीनवरून प्राप्त करता येतील.
- सुरक्षा लाईट्स – या लाईट्स व्यतिरिक्त वापरकर्त्यांची सुरक्षा लक्षात घेऊन त्यांचा अपघात झाल्यास किंवा वाहनात काही त्रास निर्माण झाल्यास किंवा वाईट हवामानात सुरक्षितता प्राप्त होईल.
* हिल होल्ड वैशिष्ट्य हे बीटा स्तरावर असून अंतिम व्हर्जन हे नंतर सुरु करण्यात येईल.
वरील वैशिष्ट्यां व्यतिरिक्त मूव्हओएस३ च्या माध्यमातून अनेक परफॉर्मन्स शी संबंधित सुधारणा या ओला स्कूटर्सच्या एस१ परिवारात आणण्यात आल्या आहेत. यामध्ये हायपर आणि स्पोर्ट्स मोड मध्ये अधिक गती, ईको मोड मध्ये अधिक टॉप स्पीड, अधिक दृष्यमानता आणि अधिक अचूकता ही विशेषकरुन स्कूटरची माहिती जसे डीटीई (डिस्टन्स टू एम्टी) , बॅटरी पर्सेंटेज, टीटीसी (टाईम टू चार्ज) इत्यादींसह अनेक छोट्या छोट्या सुधारणा दिल्या असल्यामुळे भारतातील सर्वोत्कृष्ट विकली जाणारी ईव्ही दुचाकी अधिक चांगली होत आहे.
ओला ने अतिशय गतीशीलतेने वाढीच्या योजना आखली असून देशभरात ५० हून अधिक एक्सपिरियन्स सेंटर्स सह या महिन्याच्या शेवटापर्यंत १०० आऊटलेट्स तसेच २०२३च्या मार्च पर्यत २०० आऊटलेट्स सुरु करण्याची योजना आखली आहे. ओला ने २०२५ पर्यंत भारतीय रस्त्यांवरील सर्व दुचाकी या इलेक्ट्रिकवरील असतील हे सुनिश्चित करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. यासाठी कंपनी कडून मजबूत असा इलेक्ट्रिक वाहनांचा रोडमॅप तयार करुन जगभरातील लोक इलेक्ट्रिक मोबिलिटी कडे प्रस्थान करण्यावर जोर दिला आहे.