संतूर ऑरेंज नवीन अवतारामध्‍ये पुन्‍हा लाँच; आता ‘तरूण दिसणाऱ्या त्‍वचेसाठी’ नवीन परिवर्तनांनी युक्‍त

72

१५ नोव्हेंबर 2022: संतूर या विप्रो कंझ्युमर केअर अॅण्‍ड लायटिंगच्‍या प्रमुख ब्रॅण्‍डने आपला क्‍लासिक सँडलवूड व टर्मरिक साबण संतूर ऑरेंजच्‍या रिलॉन्‍चची घोषणा केली. हे रिलॉन्‍च तरूण ग्राहकांसह संलग्‍न होण्‍यासाठी नवीन व फ्रेश परिवर्तन म्‍हणून ‘थिंग यंग’सह करण्‍यात आले आहे. अपग्रेड करण्‍यात आलेले उत्‍पादन नवीन पॅकेजिंग, सुधारित सुगंध व सर्वोत्तम मॉइश्‍चरायझेशनसह येते.

• ब्रॅण्‍डने आपल्‍या सााबणामध्‍ये सर्वोत्तम मॉइश्‍चरायझेशन, सुगंध व नवीन पॅकेजिंगसह सुधारणा केली आहे
• नवीन संवाद ब्रॅण्‍ड क्रांती –‘थिंग अॅज यंग अॅज यू लुक’ला नवीन आकार देते

चंदन व हळदीच्या चांगुलपणाने युक्‍त सुगंध संतूरचे सारव्‍यापून घेण्‍यासोबत त्‍वचा तरुण दिसण्याची खात्री देते. उच्च नैसर्गिक मॉइश्चरायझिंग लाभांसहउत्पादन लक्‍झरीअस, आनंददायी आंघोळीचा अनुभव आणि कोमल, मॉइश्चरायझ्ड त्वचा देते.

उत्तम परिवर्तनाचे संकेत देणाऱ्या‘थिंग यंग’मोहिमेचा महिलेच्‍या ओळखीबाबत समान रूढी व दीर्घकालीन समजांना दूर करण्‍याचा मनसुबा आहे. आजची संतूर महिला जीवनाप्रती तरूण व नवीन विचारांसह अमर्याद आहे, ज्‍यामधून महिलांना ‘हो, का नाही… का नाही?’म्‍हणण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे. तिचे मूल देखील या उत्‍साहवर्धक प्रवासाचा भाग आहे, आईला पाठिंबा देत आणि तिच्‍या यशाचे साक्षीदार होत ठामपणे व्‍यक्‍त करतात ‘का नाही?’.

या रिलॉन्‍चबाबत विप्रो कंझ्युमर केअर अॅण्‍ड लायटिंगचे कंझ्युमर केअर, भारत व सार्क व्‍यवसायाचे प्रमुख कार्यकारी श्री. नीरज खत्री म्‍हणाले, “संतूर दशकांपासून विप्रो कंझ्युमर केअरचा प्रमुख ब्रॅण्‍ड आहे. लाखो भारतीय महिलांचा संतूरवर विश्‍वास आहे आणि आज, संतूर सँडल व टर्मरिक सोप तरूण दिसणाऱ्या त्‍वचेशी संलग्‍न आहे. आमच्‍या विकास धोरणाचा भाग म्‍हणून संतूर आधुनिक ग्राहकांच्‍या बदलत्‍या गरजांशी जुळण्‍यासाठी सतत नाविन्‍यता आणण्‍याचा प्रयत्‍न करते. आम्‍ही विकास योजना आखली आहे, जी आमच्‍या प्रमुख उत्‍पादनांच्‍या सुधारित व्‍हर्जनला चालना देण्यामध्‍ये मदत करते, ज्‍यामधून आंघोळीच्‍या वेळी सौम्‍य क्‍लीन्सिंगसह त्‍वचेला उत्तम मॉइश्‍चरायझेशन मिळण्‍याची खात्री मिळते. आम्‍हाला विश्‍वास आहे की, संतूरचे नवीन व्‍हर्जन आमच्‍या विकासाला चालना देईल आणि बाजारपेठेतील आमची प्रिमिअम उपस्थिती अधिक प्रबळ करेल, तसेच आम्‍हाला ग्राहकांमधील सर्वात महत्त्वाकांक्षी ब्रॅण्‍ड बनवेल.’’

विप्रो कंझ्युमर केअर अॅण्‍ड लायटिंगच्‍या मार्केटिंगचे उपाध्‍यक्ष श्री. एस. प्रसन्‍न राय म्‍हणाले, “संदर्भामध्‍ये नाविन्‍यता आणण्‍यासोबत तरूण दिसणाऱ्या त्‍वचेच्‍या मुलभूत तत्त्‍वाबाबत संवाद करण्‍यामध्‍ये आणि आजच्‍या तरूण महिलांच्‍या महत्त्वाकांक्षांना सादर करण्‍यामध्‍ये एकसमानता राखणे ही संतूरची प्रमुख ताकद आहे. ‘थिंक यंग’हे आजच्‍या डायनॅमिक महिलांना प्रेरित करण्‍याच्‍या संतूरच्‍या ब्रॅण्‍ड उद्देशाशी संलग्‍न आहे. संतूरचे तत्त्वलक्षात घेत आम्‍ही संतूर विमेनची नवीन गाथा सांगण्‍याचा प्रयत्‍न करत आहोत. अतिरिक्‍त नैसर्गिक मॉइश्‍चरायझिंग अॅडिटिव्‍ह्जसह उत्‍पादन आता आंघोळीदरम्‍यान व आंघोळीनंतर उत्तम मॉइश्‍चरायझेशन देते; क्लिनिकली प्रमाणित कामगिरी निश्चितच विद्यमान ग्राहकांना, तसेच आमच्‍या नवीन उत्‍पादन वापरुन पाहणाऱ्या ग्राहकांना आनंद देईल.’’

नवीन व सुधारित संतूर १०० ग्रॅमसाठी ३६ रूपयांमध्‍ये जनरल ट्रेड व मॉडर्न ट्रेड स्‍टोअर्समध्‍ये आणि ईकॉमर्स व्‍यासपीठांवर उपलब्‍ध असेल. फॉर्च्युएटी कम्‍युनिकेशन्‍सने टीव्‍हीसी कॅम्‍पेनची संकल्‍पना मांडली आहे.