पुणे : श्रेयस तळपदे, सुबोध भावे यांच्या हस्ते ‘आयआयबी’ला ‘बेस्ट इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल अँड इंजिनिअरिंग’ पुरस्कार पुण्यातील ‘आयआयबी’ करियर इन्स्टिट्युटला बिग एफएमच्या वतीने दिला जाणारा ‘बेस्ट इन्स्टिट्युट फॉर मेडिकल अँड इंजिनिअरिंग’ पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे आणि श्रेयस तळपदे यांच्या हस्ते आयआयबी पुण्याचे संचालक ॲड. महेश लोहारे पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. बजाज आलियांज जनरल इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक तपन सिंघल उपस्थित होते.
वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून चांगले डॉक्टर्स व इंजिनिअर घडविण्याचे काम ‘आयआयबी’ करत आहे. गेल्या २३ वर्षांत ‘आयआयबी’ने 50 हजाराहून अधिक डॉक्टर्स घडविले आहेत. नांदेड, लातूर, पुणे, पिंपरी चिंचवड,कोल्हापूर, अकोला, छत्रपती संभाजी नगर आदी शहरांत ‘आयआयबी’च्या शाखा असून, हजारो विद्यार्थी ११ वी, १२ वीसह ‘नीट’ आणि ‘जेईई’ची तयारी करत आहेत.
ॲड. महेश लोहारे पाटील म्हणाले, “वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय संस्था म्हणून आयआयबी करिअर इन्स्टिट्यूटच्या झालेला गौरव प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांना अधिकाधिक दर्जेदार आणि उपयुक्त शिक्षण देऊन चांगले इंजिनिअर्स व डॉक्टर्स घडविण्यात योगदान देणाऱ्या आमच्या सर्व सहकारी व कर्मचाऱ्यांना ऊर्जा मिळेल.”
Home ताज्या घडामोडी श्रेयस तळपदे, सुबोध भावे यांच्या हस्ते ‘आयआयबी’ला ‘बेस्ट इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल अँड इंजिनिअरिंग’ पुरस्कार