श्नाइडर इलेक्ट्रिकने दीपक शर्मा यांची ग्रेटर इंडियाचे झोन अध्यक्ष, एसईआयपीएलचे एमडी आणि सीईओ म्हणून केली नियुक्ती

54
Schneider Electric appoints Deepak Sharma as Zone President Greater India, MD & CEO, SEIPL

नवी दिल्ली : एनर्जी मॅनेजमेंट आणि नेक्स्ट-जेन ऑटोमेशन सोल्यूशन्सच्या डिजिटल परिवर्तनातील अग्रणी असलेल्या श्नाइडर इलेक्ट्रिकने झोन अध्यक्ष – ग्रेटर इंडिया आणि एसईआयपीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  म्हणून श्री. दीपक शर्मा यांची नियुक्ती करत असल्याचे जाहीर केले असून ही नियुक्ती १ मे २०२३ पासून होत आहे. दीपक शर्मा श्री. अनिल चौधरी यांच्याकडून पदभार स्वीकारतील.

दीपक यांना श्नायडर इलेक्ट्रिक मध्ये  भारत, फ्रान्स, चीन आणि यूएसए मधील एनर्जी मॅनेजमेंट आणि इंडस्ट्रियल ऑटोमेशन व्यवसायांमध्ये विविध भूमिका हाताळण्याचा २४ वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्या या पूर्वीच्या कार्यकक्षेत श्री. शर्मा यांनी विलीनीकरण आणि अधिग्रहण विभागाचे एसव्हीपी म्हणून एल अँड टी इलेक्ट्रिकल आणि श्नायडर इलेक्ट्रिकसह ऑटोमेशन बिझनेसच्या  एकत्रीकरणाचे नेतृत्व केले. ३४,५०० कर्मचारी आणि ३० हून अधिक कारखान्यांसह भारताला श्नाइडर इलेक्ट्रिकच्या चार जागतिक केंद्रांपैकी एक बनवण्यात हे एकीकरण महत्त्वाचे होते.

श्री. अनिल चौधरी यांनी ग्रेटर इंडिया, श्नाइडर इलेक्ट्रिकचे झोन अध्यक्ष आणि एसईआयपीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी  म्हणून १० हून अधिक वर्षे कार्यभार सांभाळला. श्नाइडर इलेक्ट्रिक ग्रुपमध्ये नवीन जागतिक नेतृत्वाची भूमिका स्वीकारण्यासाठी ते फ्रान्समध्ये आता कार्यरत होणार आहेत.

Schneider Electric appoints Deepak Sharma as Zone President

Greater India, MD & CEO, SEIPL

या प्रसंगी बोलताना श्री. अनिल चौधरी म्हणाले, “ग्रेटर इंडिया झोनचे झोन अध्यक्ष म्हणून माझा कार्यकाळ अत्यंत समाधानकारक आहे. गेल्या दशकात आम्ही श्नायडर इलेक्ट्रिक ग्रुपमध्ये आणि बाहेर सातत्याने प्रगती केली आहे. लाखो भारतीयांना लाभ मिळवून देत स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर वाढ, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया आणि अॅक्सेस टू एनर्जी प्रोग्रामसह सामाजिक कार्यासाठी एक महत्त्वाचा भागीदार म्हणून श्नाइडर इलेक्ट्रिकला स्थान मिळवून देण्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी दीपक शर्मा यांना भारताला अधिक इलेक्ट्रिक, अधिक डिजीटल आणि अधिक शाश्वत बनविण्याच्या त्यांच्या नवीन भूमिकेसाठी शुभेच्छा देतो.”

आपल्या नियुक्तीबद्दल बोलताना श्री. दीपक शर्मा म्हणाले, “माझी ग्रेटर इंडिया झोन प्रेसिडेंट आणि एसईआयपीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक केल्याबद्दल मी खूप आनंदी आहे. श्नाइडर इलेक्ट्रिक संशोधन आणि विकास,  नाविन्यपूर्णता, उत्पादन आणि कौशल्य विकास यामधील गुंतवणूकीद्वारे भारताच्या विकासासाठी वचनबद्ध आहे. जागतिक कंपन्यांमध्ये देशात आपला ठसा उमटविणारी देशातील सर्वात जवळची कंपनी आम्ही आहोत. माझ्या नवीन भूमिकेत देशाच्या अमृत महोत्सवी काळात मी आमची क्षमता वाढवण्यास आणि भारताला अधिक डिजिटल आणि शाश्वत बनवण्यासाठी आमच्या योगदानाला गती देण्यासाठी उत्सुक आहे. भारत हवामान सकारात्मक होण्याच्या दिशेने निर्णायक पावले उचलत असताना सरकार, सार्वजनिक आणि खाजगी उद्योग यांच्या शाश्वतता आणि डिजिटायझेशनच्या प्रवासात मी वर्धित सहयोग आणि भागीदारीची अपेक्षा करतो.”

त्यांच्याकडे मॅनेजमेंट आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पदविका आहेत आणि आयआयएम अहमदाबाद, INSEAD फ्रान्स आणि UNC केनन-फ्लेग्लर बिझनेस स्कूल, यूएसएच्या कार्यकारी शिक्षण कार्यक्रमांतून त्यांनी यशस्वीरित्या प्रशिक्षण घेतलेले आहे.