पुणे, ७ फेब्रुवारी २०२३: ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक क्षेत्रातील आघाडीची पुरवठादार शेफलर इंडिया लिमिटेडने (बीएसई: ५०५७९०, एनएसई: SCHAEFFLER) श्रीमती सुमिताश्री इरंती यांना आपल्या संचालक मंडळाच्या नव्या अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.
उद्योगांचे नेतृत्व, तंत्रज्ञान, सल्ला आणि आर्थिक सेवा क्षेत्रात २५ वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या श्रीमती सुमिताश्री इरंती यांच्या अनुभव व ज्ञानाचा लाभ या नवीन जबाबदारीमध्ये निश्चितच खूप जास्त होईल.
तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये त्यांनी आजवर अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या आहेत, यामध्ये जागतिक सेवा पोर्टफोलिओचे नेतृत्व, सीएक्सओ सहयोग, पीअँडएल ओनरशिप, मोठ्या खात्यांचे व्यवस्थापन, व्यवसायविषयक सल्ला आणि उत्पादन विकास यांचा समावेश आहे. जर्मनी, भारत, यूएसए, युके आणि नेदरलँड्ससह ११ देशांमध्ये राहण्याचा व काम करण्याचा बहु-सांस्कृतिक अनुभव त्यांनी मिळवला आहे.
श्रीमती इरंती २०२० सालापासून शेफलर इंडिया लिमिटेडच्या बोर्डाच्या एक स्वतंत्र संचालक आहेत. त्या अविवा लाईफ इन्श्युरन्स कंपनी इंडिया लिमिटेडमध्ये संचालक मंडळाच्या अध्यक्ष आहेत आणि मंडळ सदस्य म्हणून इतर कंपन्यांशी देखील संबंधित आहेत.
२० वर्षांहून अधिक काळ कंपनीचे नेतृत्व केल्यानंतर श्री. अविनाश गांधी सेवानिवृत्त झाले आहेत आणि आता अध्यक्षपदाची जबाबदारी श्रीमती इरंती यांच्यावर सोपवण्यात आली आहे. शेफलर इंडियाचा विकास आणि यश यांना सातत्याने पुढे नेत राहण्याच्या संचालक मंडळाच्या मिशनचे नेतृत्व आता श्रीमती इरंती करतील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नावीन्य आणि उत्कृष्टतेप्रती वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करणे कायम सुरु ठेवावे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
संचालक मंडळाच्या नव्या अध्यक्ष म्हणून श्रीमती इरंती यांची नियुक्ती हा शेफलर इंडियासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. कंपनी वैविध्य आणि समावेश यांना प्रोत्साहन देण्यासाठी वचनबद्ध आहे व ही नियुक्ती त्याचेच द्योतक आहे.
श्रीमती सुमिताश्री इरंती यांनी सांगितले, “बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती होणे हा माझ्यासाठी एक खूप मोठा सन्मान आहे. संचालक मंडळाचा विश्वास आणि समर्थन याबद्दल मी त्यांची आभारी आहे. बोर्डाचे प्रतिभावंत सदस्य आणि शेफलर इंडियाची व्यवस्थापन टीम यांच्यासोबत काम करणे हा माझ्यासाठी खूप मोठा आनंद असेल.”
संचालक मंडळाच्या नव्या अध्यक्ष म्हणून श्रीमती इरंती यांचा नवा दृष्टिकोन व त्यांचे नेतृत्व यासाठी शेफलर इंडिया उत्सुक आहे.