शेतकर्‍यांनो! अकाऊंटमध्ये येतील 7 व्या हफ्त्याचे पैसे; मोबाईलवरच ‘या’ पद्धतीने चेक करा नाव…

790

देशातील कोट्यवधी शेतकर्‍यांच्या खात्यात लवकरच पंतप्रधान किसान योजनेंतर्गत सातव्या हफ्त्याचे पैसे टाकले जातील. केंद्र सरकार 10 डिसेंबरपासून शेतकर्‍यांच्या खात्यात सातव्या हफ्त्याची रक्कम पाठवण्यास सुरूवात करू शकते.

लाभार्थी लिस्टमध्ये असे चेक करा आपले नाव-

पीएम किसान योजना 2020 ची नवी यादी https://bit.ly/37FHAxx या वेबसाईटवर तपासू शकता.

येथे फार्मर्स कॉर्नरवर जाऊन ‘लाभार्थी यादी’ (बेनिफिशिअरी लिस्ट) च्या लिंकवर क्लिक करा.

यानंतर आपले राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, ब्लॉक आणि गाव असा तपशील तेथे भरा.

एवढे भरल्यानंतर गेट रिपोर्ट वर क्लिक करा आणि संपूर्ण लिस्ट पाहा.

तुमच्या हफ्त्याबद्दलची सर्व माहिती अशी चेक करा-

पीएम किसान वेबसाईट https://bit.ly/37FHAxx वर जाऊन होम पेजवर फार्मर कॉर्नरवर जा.

येथे बेनिफिशिअरी स्टेटसवर क्लिक करा. आता या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी 3 पर्याय दिसतील.

आधार नंबर, अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर, यापैकी एक पर्याय निवडून तो नंबर खालील बॉक्समध्ये भरा. आता गेट डाटा वर क्लिक करा.

सरकारकडून या योजनेंतर्गत प्रत्येक वर्षी शेतकर्‍याला 2 हजार रुपयांच्या तीन हफ्त्यात 6000 रुपये दिले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे जरूरी आहे.