शिवसेनेच्या महिला पुणे शहर प्रमुखपदी पूजा रावेतकर

46
पुणे : शिवसेनेच्या महिला पुणे शहर प्रमुखपदी पूजा रावेतकर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पुणे शहर प्रमुखपदी पूजा रावेतकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील एक वर्षांकरिता ही नियुक्ती असून, रावेतकर यांच्या नियुक्तीचे शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी दिले आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण याचा सक्रियपणे प्रचार व प्रसार करून शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन काम कराल, असे त्यांना दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे.
मधुमालती आसरा फाउंडेशन आणि शिवसेना पक्षाच्या माध्यमातून रावेतकर महिलांनासाठी विविध उपक्रम राबवत असून, येणाऱ्या काळात महिला संघटन मजबूत करून महिला भगीनींच्या समस्या सोडवण्याचा, तसेच शासकीय योजनांच्या माध्यमातून महिलाना आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. रावेतकर यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.